सटाण्यात पंचरंगी लढती

By admin | Published: November 11, 2016 11:15 PM2016-11-11T23:15:17+5:302016-11-11T23:53:15+5:30

शहर विकास आघाडीचे आव्हान : २१ जागांसाठी ९२ उमेदवार

Fifth round matches | सटाण्यात पंचरंगी लढती

सटाण्यात पंचरंगी लढती

Next

सटाणा : नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे आज उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी भाजपा, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, शिवसेना आणि शहर विकास आघाडी हे पाच उमेदवार रिंगणात आहेत, तर नगरसेवकपदाच्या एकवीस जागांसाठी ३८ उमेदवारांनी माघार घेतली. दहा प्रभागांमधून आता ९२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे थेट अध्यक्षपदासाठी पंचरंगी, तर बहुतांश प्रभागात पंचरंगी, षष्ठरंगी, सप्तरंगी लढती रंगणार आहेत.
माघारीची मुदत संपल्याने निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला नगरसेवकपदाच्या २१ जागांसाठी १४८ उमेदवारांनी २७६ उमेदवारी अर्ज दाखल केलेले असतांना अर्ज छाननी मध्ये तब्बल १४६ अर्ज बाद करण्यात आले होते.बहुतांश उमेदवारांनी एकाच प्रभागात दोन,तीन,चार असे अर्ज केल्यामुळे तर काही उमेदवारांना सबंधित पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे अनेकांचे अर्ज बाद झाले होते.अर्ज छाननीनंतर १० प्रभागांमध्ये एकूण १३० जणांचे उमेदवारी अर्ज होते. तरी निवडणुकीचे खरे चित्र माघारीच्या अंतिम दिवशी स्पष्ट होणार असल्याने शहरवासियांचे लक्ष लागून होते. कोणत्या प्रभागात कोणाची माघार प्रभाग क्र मांक १ (अ) मध्ये डॉ. मिच्छंद्रनाथ सूर्यभान बर्डे यांनी माघार घेतली आहे. प्रभाग १ अ मध्ये गिरीश अनिल कुंवर , तेजस वामन गवळी, कांतीलाल लक्ष्मण चव्हाण, दिलीप शिवाजी निकम ,बाळू उत्तम बागुल ,शंतनू लक्ष्मण सोनवणे या सहा उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.(ब) मधून सुशीला दादाजी रौंदळ आणि रोहिणी सुहास पवार यांची माघार; प्रभाग क्र मांक २ (अ) विजयराव किसनराव वाघ आणि सुमित विजयराव वाघ या पितापुत्रांची माघार; (ब) मधून मीना निवृत्ती सोनवणे यांची माघार; प्रभाग क्र मांक ४ (अ) संगीता देवेंद्र सोनवणे यांची माघार; (ब) मधून महेंद्र धोंडू खैरनार , यमाजी सोनवणे , विजयराव वाघ , भूषण सोनवणे यांची माघार, प्रभाग क्र मांक 6 (अ) पंकज ततार,अमोल देवर, परेश देवरे, राजेंद्र देवरे, जगदीश मुंडावरे,कैलास येवला या सहा उमेदवारांची माघार, प्रभाग ७ (ब) वैशाली सोनवणे यांची माघार; प्रभाग ८ (अ) योगिता पाकळे यांची माघार; (ब) दीपक नंदाळे यांची माघार; प्रभाग ९ (अ) अस्मिता पवार आणि मुकुंद बस्ते यांची माघार, दिलीप दावल ; (ब) निर्मला सोनवण, पूजा सुपडू नानकर, मुल्ला शमीम शफिक,े यशोदा
अहिरे, कौशल्या सोनवणे या पाच उमेदवारांची माघार, (क) शेख रशिदाबी मुख्तार,शेख सिरीन सादिक,शेख सायरा भिकन,सिंधुबाई सोनवणे, मन्सुरी शमा आरिफ यांनी माघारी घेतली आहे.(वार्ताहर)

Web Title: Fifth round matches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.