पाच जिल्ह्यांतील पावणेचार हजार गुन्हेगार पोलिसांकडून दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 05:07 PM2020-10-07T17:07:00+5:302020-10-07T17:07:39+5:30

पाचही जिल्ह्यांचे मिळून सुमारे ३ हजार ४६५ सराईत गुन्हेगारांची ‘ब्ल्यू प्रिंट’ विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयाकडून तयार करण्यात आली

Fifty-four thousand criminals from five districts were adopted by the police | पाच जिल्ह्यांतील पावणेचार हजार गुन्हेगार पोलिसांकडून दत्तक

पाच जिल्ह्यांतील पावणेचार हजार गुन्हेगार पोलिसांकडून दत्तक

Next
ठळक मुद्दे२ हजार ७९३ कर्मचारी ठेवणार ‘वॉच’

नाशिक : परिक्षेत्रातील अहमदनगर, जळगाव, धुळे, नाशिक ग्रामिण, नंदुरबार या पाच जिल्ह्यांमधील गुन्हेगारीची पाळेमुळे उखडून फेकण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. या पाचही जिल्ह्यांचे मिळून सुमारे ३ हजार ४६५ सराईत गुन्हेगारांची ‘ब्ल्यू प्रिंट’ विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयाकडून तयार करण्यात आली असून त्यांच्यावर २ हजार ७९३ पोलीस कर्मचारी ‘वॉच’ ठेवून राहणार असून गुन्हेगार दत्तक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी दिली.

दिघावकर म्हणाले, परिक्षेत्रातील गुन्हेगारी कमी करण्यासोबत गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा यासाठी गुन्हेगार दत्तक योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत मागील सात वर्षांमध्ये ज्या गुन्हेगारांवर दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी, खंडणी, घरफोडी, शस्त्र बाळगणे, महामार्ग लुटीचे गुन्हे दाखल आहेत, अशा सर्व गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश पाचही जिल्ह्यांच्या अधीक्षकांना देण्यात आले आहेत. या अधिक्षकांकडून अपर पोलीस अधिक्षकांच्या नियंत्रणाखाली पोलीस ठाणेनिहाय कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक गुन्हेगार दत्तक देण्यात आला आहे. या गुन्हेगाराच्या हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून राहणार आहेत. याबाबतचा अहवाल संबंधितांनी १५ दिवसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे, असेही दिघावकर यांनी स्पष्ट केले.

जिल्हानिहाय गुन्हेगार अन् कर्मचारी संख्या अशी
अहमदनगर - ८९५ गुन्हेगार- ५९६ कर्मचारी
जळगाव- १ हजार १४४ गुन्हेगार- ६७५ कर्मचारी
नाशिक- ९६७ गुन्हेगार- ८२१ कर्मचारी
धुळे- ६४७ गुन्हेगार- ५८९ कर्मचारी
नंदुरबार-११२ गुन्हेगार ११२ कर्मचारी असे एकूण परिक्षेत्रातील ३ हजार ७६५ गुन्हेगारांवर एकूण २ हजार ७९३ कर्मचारी लक्ष ठेवुन राहणार आहेत.
 

Web Title: Fifty-four thousand criminals from five districts were adopted by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.