प्रतिष्ठा अन् अस्तित्वाची लढत

By admin | Published: February 15, 2017 01:09 AM2017-02-15T01:09:34+5:302017-02-15T01:09:49+5:30

दुरंगी सामना : गट महिला राखीव झाल्याने चुरस वाढली

Fight against prestige and existence | प्रतिष्ठा अन् अस्तित्वाची लढत

प्रतिष्ठा अन् अस्तित्वाची लढत

Next

सागर रायजादे : नगरसूल
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिला राखीव झाल्याने नगरसूल या गटाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद लाभलेल्या नगरसूल जिल्हा परिषद गटात यंदा मात्र आरक्षणाने मातब्बरांना वाकुल्या दाखविल्याने काहीशी नाराजी झाली असली तरी, महत्त्वाकांक्षेमुळे सेनेच्या संभाजीराजे पवारांची प्रतिष्ठा आणि राष्ट्रवादीची अस्तित्वाची लढाईमुळे या गटाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. सलग दोन पंचवार्षिक आमदारकीचा अनुभव आणि गत विधानसभेच्या निवडणुकीत आमदार छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचे संभाजीराजे पवार यांनी कडवी झुंज दिल्याचा इतिहास आहे. यामुळे पवारांशी सामना कोणी करावा, यासाठी राष्ट्रवादी चिंतन करीत असताना त्यांना इतर मागास वर्गीयात उमेदवार सापडेना, अशी स्थिती होती. स्वर्गीय आमदार जनार्दन पाटील यांच्या स्नुषा कालिंदी पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देऊ केली होती. परंतु त्यांनी घड्याळ हातात न घेता अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि तो अपेक्षेप्रमाणे माघारीही घेतला.  अखेर सुनील पैठणकर या भुजबळ यांच्या कट्टर समर्थकास आदेश झाला. आणि त्यांच्या सौभाग्यवती उज्ज्वला पैठणकर यांना उमेदवारी करावी लागली. यामुळे बिनविरोध होणारी निवडणूक नगरसूल गटात दुरंगी झाली. नगरसूल गट-गण आणि सावरगाव गणात शिवसेना आणि राष्ट्रवादीने उमेदवारीचे सारखेच सामाजिक समीकरण बसवण्याचा प्रयत्न केला असला तरी सेनेने उजवी चाल खेळत वातावरण निर्मिती केली आहे, तर कार्यकत्यांचे मोहळ असल्याने पवारांनी प्रचारात चांगलाच रंग भरला. नगरसूल गटात भाजपाने उमेदवारच दिला नाही. शिवाय सावरगाव गणात राष्ट्रवादीला उमेदवार देता आला नाही.  नगरसूल गटात शिवसेनेतर्फे सविता बाळासाहेब पवार रिंगणात आहेत. मारोतराव पवार यांचा दहा वर्षांचा आमदारकीचा काळ, सततचा दांडगा जनसंपर्क, मागेल त्याला मदतीचा हात ही सविता पवार यांची बलस्थाने आहेत. राष्ट्रवादीकडून उज्ज्वला सुनील पैठणकर रिंगणात आहेत. सुनील पैठणक यांची आमदार छगन भुजबळ यांचे समर्थक व कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. उज्ज्वला पैठणकर या सध्या नगरसूल ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आहेत, तर सुनील पैठणकर यांनी यंदा सोसायटीच्या निवडणुकीत एकहाती सत्ता स्थापन केली असून, ही उज्ज्वला पैठणकर यांची बलस्थाने आहेत.
गटातील समीकरणात बदल
जिल्ह्यााच्या राजकारणात नगरसूल गट सातत्याने प्रभावी ठरला आहे. सावरगाव गणाच्या समावेशामुळे नगरसूल गटाची गणितं आता बदलली आहेत. आता या गटात नवी समीकरणे निर्माण झाली आहेत. गटात आरक्षणामुळे इच्छुकांना आपल्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरावे लागले. या गटात नेहमी पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा या पाणीप्रश्नावर निवडणुका लढविल्या गेल्या. मोठ्या प्रमाणावर आमदार भुजबळ यांच्या कार्यकाळात या कालव्याचे काम झाले असले तरी काम अद्याप अपूर्ण आहे. भाजप-सेनेने सत्ता काळात या कालव्याचा प्रश्न अद्याप जिव्हाळ्याने हाताळला नाही. या कालव्याचे काम मार्गी लावणे गरजेचे आहे.

Web Title: Fight against prestige and existence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.