बहुजन समाजाला एका छताखाली आणण्यासाठी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 10:32 PM2021-08-18T22:32:05+5:302021-08-18T22:35:07+5:30

सिन्नर: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मी लढा देतोय, हीच आपली मूळ भूमिका आहे. त्याचबरोबर बहुजन समाजाला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी हा लढा असल्याचे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी केले.

Fight to bring Bahujan Samaj under one roof | बहुजन समाजाला एका छताखाली आणण्यासाठी लढा

सिन्नर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यमंदिर, महाकवी वामनदादा कर्डक रंगमंच व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दालनाचे लोकार्पण करताना छत्रपती संभाजी महाराज. समवेत माजी आमदार राजाभाऊ वाजे, प्रकाश वाजे, हेमंत गोडसे, उदय सांगळे, किरण डगळे, हेमंत वाजे, कृष्णाजी भगत, संजय केदार संजय सानप यांच्यासह नगर परिषद पदाधिकारी.

Next
ठळक मुद्देछत्रपती संभाजी महाराज : सिन्नर येथे नाट्यगृहासह विविध कामांचे लोकार्पण

सिन्नर: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मी लढा देतोय, हीच आपली मूळ भूमिका आहे. त्याचबरोबर बहुजन समाजाला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी हा लढा असल्याचे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी केले.

सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन, सिन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण कामाचे लोकार्पण, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यमंदिर, महाकवी वामनदादा कर्डक रंगमंच व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दालन या इमारतींचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शिवसेना नेते उदय सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे, पंचायत समितीच्या सभापती रोहिणी कांगणे, कृष्णाजी भगत, करण गायकर, राजेश गडाख, संग्राम कातकाडे, शिवाजीराव देशमुख, सोमनाथ तुपे, संजय सानप यांच्यासह नगरसेवक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

स्वराज्य बारा बलुतेदार व अठरा पगड जातीचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांचेही बहुजन समाजासोबत सलोख्याचे संबंध होते. छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्या लढ्याला गालबोट लागू नये ही सामाजिक भीती आपल्याला वाटत असल्याचे ते म्हणाले. नगराध्यक्ष किरण डगळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, विजय करंजकर यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याधिकारी संजय केदार यांनी आभार मानले.
 

Web Title: Fight to bring Bahujan Samaj under one roof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.