कंपनीतील लॅपटॉप गायब प्रकरणीसंशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 10:26 PM2021-03-24T22:26:47+5:302021-03-25T00:51:42+5:30
वणी : दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे शिवारातील व्हर्टेक्स सिस्टीम कंपनीतुन ५८ हजाराचा लॅपटॉप लांबविल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये सातपुरच्या संशयिताविरोधात दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

व्हार्टेक्स सिस्टीम प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीत उड्डाण पुलाचे पाटे तयार केले जातात. या कंपनीचे संचालक नरेन्द्र वर्टी यांनी सातपुरच्या औद्योगिक क्षेत्रातील तौसिफखान जहीरखान पठाण हे सदरच्या कंपनीत डिझाईन इंजिनियर म्हणून कार्यरत होते. कंपनीच्या रुममधे त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अनेक दिवसांपासुन पठाण हे कंपनीत येत नसल्याने याची विचारणा भ्रमणध्वनीवर केली. मात्र योग्य प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे वर्टी हे कर्मचाऱ्यामार्फत पठाण यांच्या रुमवर गेले असता तेथे लॅपटॉप नसल्याचे निदर्शनास आले. सिसिटिव्ही फुटेजच्या तपासणीत मात्र पठाणचे हे त्यावर काम करत असल्याचे निदर्शनास आले. र्लपटॉप लांबविल्याचे लक्षात येताच वर्टी यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरुन दिंडोरी पोलिसांनी पठाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.