मतपत्रिकांची नक्कल केल्यास होणार गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:49 AM2019-03-19T01:49:33+5:302019-03-19T01:49:50+5:30
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाने वा उमेदवाराने निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या निवडणूक मतपत्रिकेची नक्कल करणारी मतपत्रिका ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाने वा उमेदवाराने निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या निवडणूक मतपत्रिकेची नक्कल करणारी मतपत्रिका छपाई केल्यास उमेदवारासह त्याची छपाई करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश बजावले आहेत. बहुतांशी वेळेस राजकीय पक्ष वा उमेदवारांकडून मतदारांना मतदान कसे व कोणाला करावे यासाठी नमुना मतपत्रिका तयार केली जाते. यंदा आयोगाने त्याला निर्बंध घातले आहेत.
हुबेहूब मतपत्रिकेची नक्कल, रंग, कागद वापरल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
निवडणूक आचारसंहितेचाच हा भाग असून, उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीने मुद्रणालयाच्या सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाºया मालकाने तसेच प्रकाशकांनी नमुना मतपत्रिका छापू नये, असे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्णात त्याला निर्बंध घालण्यात आले असून, त्यात उमेदवारांचे नाव व त्यांना नेमुना देण्यात आलेली चिन्हे छापणे, नमुना मतपत्रिकेसाठी निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे, निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे गैर असल्याने त्याचा भंग झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे. हा सदरचा आदेश मंगळवार, १९ मार्च ते ३० एप्रिल या काळासाठी लागू राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.