...अखेर पोलिसांच्या हद्दीचे फलक ‘झळकले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 11:48 PM2020-02-20T23:48:00+5:302020-02-21T00:29:41+5:30

पोलीस ठाण्यांच्या हद्दीच्या वादात अनेकदा गुन्हेगारांना रान मोकळे मिळत होते किंवा गुन्हे घडल्यानंतर नेमक्या कोणत्या पोलीस ठाण्यांची मदत घ्यावी, असा संभ्रमदेखील निर्माण होत होता. कारण कुठल्या पोलीस ठाण्यांची हद्द कोठे? हा प्रश्न नागरिकांना सतावत होता. यावर मात करण्यासाठी आयुक्तालयाच्या आदेशानंतर सर्वच पोलीस ठाण्यांची हद्द दर्शविणारे मार्गदर्शक फलक शहरात जागोजागी झळकल्याचे दिसून येत आहे.

... finally 'flashes' of border police | ...अखेर पोलिसांच्या हद्दीचे फलक ‘झळकले’

...अखेर पोलिसांच्या हद्दीचे फलक ‘झळकले’

Next
ठळक मुद्देसंभ्रम दूर : पोलीस ठाण्यांच्या माहितीसाठी सुविधा

नाशिक : पोलीस ठाण्यांच्या हद्दीच्या वादात अनेकदा गुन्हेगारांना रान मोकळे मिळत होते किंवा गुन्हे घडल्यानंतर नेमक्या कोणत्या पोलीस ठाण्यांची मदत घ्यावी, असा संभ्रमदेखील निर्माण होत होता. कारण कुठल्या पोलीस ठाण्यांची हद्द कोठे? हा प्रश्न नागरिकांना सतावत होता. यावर मात करण्यासाठी आयुक्तालयाच्या आदेशानंतर सर्वच पोलीस ठाण्यांची हद्द दर्शविणारे मार्गदर्शक फलक शहरात जागोजागी झळकल्याचे दिसून येत आहे.
एखाद्या ठिकाणी अपघात, लूटमार, घरफोडी झाल्यास आपण ज्या ठिकाणी आहोत, तो परिसर नेमक्या कोणत्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येतो, याविषयी नागरिकांमध्ये कमालीची संभ्रमावस्था होती. त्याचप्रमाणे गुन्हा घडल्यानंतर पंचनामा करताना पोलीसही काहीवेळा बुचकुळ्यात पडत होते. तसेच विविध रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांना अत्यावश्यक आपत्कालीन मदतीची गरज भासल्यास नागरिकदेखील अनोळखी परिसरात गोंधळून जात होते. तसेच नाशिकच्या बाहेरून आलेल्या पाहुण्यांनाही अनेकदा पोलिसांची मदत घ्यावयाची गरज पडल्यास त्यांनाही संपर्क करताना अडचणी उद्भवत होत्या. आयुक्तालयाच्या हद्दीत काही वर्षांपूर्वी अंबड, सरकारवाडा, भद्रकाली, उपनगर या जुन्या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून इंदिरानगर, मुंबईनाका पोलीस ठाणे तसेच पंचवटी, गंगापूर पोलीस ठाण्यांचे विभाजन होऊन म्हसरूळ, आडगाव पोलीस ठाणे अस्तित्वात आले. यामुळे पोलीस ठाण्यांची हद्ददेखील बदलली. यामुळे रहिवाशांचा संभ्रम अधिकच वाढीस लागला होता. अजूनही नव्याने अस्तित्वात आलेल्या पोलीस ठाण्यांची हद्द कोठून कोठेपर्यंत आहे, हे सर्वसामान्यांना फारसे लक्षात येत नाही. ही बाब लक्षात घेत पोलीस आयुुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस ठाण्यांच्या हद्दीच्या चारही दिशा लक्षात घेत फलक लावण्याचे आदेश दिले. पंधरवड्यात शहरातील सर्वच उपनगरांमधील पोलीस ठाण्यांची हद्द झळकविणारे फ लक नागरिकांच्या नजरेस पडू लागले आहे.
...असे आहेत फलक
पोलीस ठाण्याचे नाव व हद्द, तसेच पोलिसांचे नियंत्रण कक्ष, संबंधित पोलीस ठाण्याचे दूरध्वनी क्रमांक आदी माहिती या फलकांवर प्रदर्शित करण्यात आली आहे. हे फलक लोखंडी स्वरूपात बनविण्यात आले असून, रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये दर्शनी भागात ते लावण्यात आले आहेत. या फलकांना गडद निळा रंग देण्यात आला आहे. तसेच फलकाच्या अग्रभागी महाराष्टÑ पोलिसांचे बोधचिन्हदेखील पहावयास मिळते.

Web Title: ... finally 'flashes' of border police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.