नाशिक वनवृत्तांतर्गत असलेल्या नाशिक पूर्व, पश्चिम विभागातील काही वनपरिक्षेत्रांमधील प्रादेशिक, वन्यजीव, सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे. पश्चिम भागातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तर पूर्वमधील देवळा, येवला, नांदगाव या वनपरिक्षेत्रांना नवीन वनक्षेत्रपाल लाभले आहे. मागील दोन वर्षांपासून हरसूल आणि वर्षभरापासून सुरगाणासारख्या अतिसंवेदनशील वनपरिक्षेत्रांना या बदल्यांमध्येही दिलासा मिळू शकलेला नाही. सीमावर्ती भागाला लागून असलेल्या या वनपरिक्षेत्रांसाठी वनक्षेत्रपालांची अत्यंत गरज असतानाही अजूनही स्वतंत्ररीत्या या दोन्ही वनपरिक्षेत्रांना वनक्षेत्रपाल मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या दोन्ही वनपरिक्षेत्रात साग, खैरसारखी मौल्यवान प्रजातींच्य वृक्षसंपदेचे जंगल असून, सातत्याने या भागात तस्करांची घुसखोरी सुरू असते. यामुळे येथील वन-वन्यजीव संपदेला संरक्षण पुरविण्यासाठी आणि तस्करांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पूर्णवेळ वनक्षेत्रपाल नियुक्त करणे गरजेचे आहे. सुरगाणा दक्षता पथकाच्या वनक्षेत्रपालांचीही बदली करण्यात आल्याने सुरगाणा प्रादेशिक वनपरिक्षेत्र हे पूर्णत: पोरके झाले आहे. तसेच ननाशी, चांदवड परिक्षेत्रालाही वनक्षेत्रपालांची प्रतीक्षा कायम आहे.
--इन्फो--
‘रेंजर’च्या बदल्या अशा...
पाल वन्यजीवचे राजेश पवार - त्र्यंबकेश्वर (प्रादेशिक)
ताडोबा विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या मनीषा जाधव -सिन्नर वनपरिक्षेत्र (प्रादेशिक)
अमरावतीजवळील गुगामल वन्यजीवचे हिरालाल चौधरी- इगतपुरी (सामाजिक)
इगतपुरी सामाजिकचे अरुण सोनवणे- पेठ (प्रादेशिक)
पेठच्या सीमा मुसळे- नाशिक वन डेपो, म्हसरूळ
नांदेड सामाजिकच्या पूजा जोशी- दिंडोरी (प्रादेशिक),
धुळ्याजवळील मेवासीचे चंद्रकांत कासार- नांदगाव (प्रादेशिक)
यावल वन्यजीवचे विशाल कुटे - नाशिक (सामाजिक वनीकरण)
सामाजिक वनीकरण नाशिकचे प्रदीप कदम- संगमनेर-अकोले (प्रादेशिक)
जामन्या वन्यजीवचे अक्षय म्हेत्रे- येवला (प्रादेशिक)
सुरगाणा संरक्षण, अतिक्रमणचे कौतिक ढुमसे- देवळा (प्रादेशिक)
सामाजिक वनीकरण संगमनेरचे केतन बिरारीस- इगतपुरी (प्रादेशिक),
बागलाण सामाजिकचे भास्कर तावडे - सुरगाणा (सामाजिक वनीकरण),
अकोले प्रादेशिकच्या भाग्यश्री पोले- नाशिक कार्य आयोजन विभाग
संगमनेर प्रादेशिकचे नीलेश आखाडे- निफाड (सामाजिक वनीकरण)
मालेगावचे उपविभागीय वनधिकारी विलास कांबळे- कळवण (सामाजिक वनीकरण)
निफाड सामाजिकचे संदीप पाटील- संगमनेर, उपविभागीय वनधिकारी
160821\16nsk_92_16082021_13.jpg
वन कार्यालय