...अखेर मादीसह बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:01 AM2019-09-02T00:01:16+5:302019-09-02T00:05:03+5:30

सिन्नर : सिन्नर-डुबेरे रस्त्यावर बेलांबा शिवारात वाजे मळ्यात बिबट्याने पिंजरा तोडून त्यातून पलायन केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली होती. बिबट्याने पिंजरा तोडून पलायन केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. वनविभागाने पुन्हा त्याच ठिकाणी पिंजरा लावल्यानतंर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या मादीला पिंजºयात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

... finally locked in a cage with a female | ...अखेर मादीसह बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

...अखेर मादीसह बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

Next
ठळक मुद्देसिन्नर : वनविभागला यश; मुसळगाव शिवारात बिबट्याची दहशत कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : सिन्नर-डुबेरे रस्त्यावर बेलांबा शिवारात वाजे मळ्यात बिबट्याने पिंजरा तोडून त्यातून पलायन केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली होती. बिबट्याने पिंजरा तोडून पलायन केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. वनविभागाने पुन्हा त्याच ठिकाणी पिंजरा लावल्यानतंर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या मादीला पिंजºयात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गेल्या तीन दिवसाच्या काळात वनविभागाने लावलेल्या पिंजºयात एक वर्षाचा बछडा व बिबट्या मादी जेरबंद झाली असून मात्र बछड्याचा या शिवारात मुक्त वावर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सिन्नर- डुबेरे रस्त्यावर बेलांबा शिवारात गेल्या आठ दिवसांपासून आमदार राजाभाऊ वाजे व मविप्रचे संचालक हेमंत वाजे यांच्या शेतात बिबट्याच्या जोडीसह दोन बछड्यांचा वावर असल्याने अनेकांनी पाहिले होते. त्यामुळे या भागात सोमवारी (दि. २६) वनविभागाने हेमंत वाजे यांच्या आवळ्याच्या बागेत पिंजरा लावला होता. या पिंजºयात भक्ष्य ठेवण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे या पिंजºयात एक वर्षाचा बछडा अलगद अडकला. त्यानंतर उर्वरित बछडा व बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने स्थानिकांच्या मदतीने आवळ्याच्या बागेत दुसऱ्यांदा पिंजरा लावला होता.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजºयात शुक्रवारी मध्यरात्री बिबट्या अडकला होता; मात्र बछड्याच्या विरहाने बिबट्याने पिंजरा तोडून त्यातून पलायन केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. डरकाळ्या फोडत त्याने पूर्ण ताकदीनिशी पिंजºयाचा पत्रा वाकवून बाहेर पडला. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.
शनिवारी सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे, वनरक्षक एस.बी. थोरात, ए.आर. इरकर, पी.जी. बिन्नर, बालम शेख, रमेश आवारी, रोहित लोणारे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. वनविभागाने तोडलेला लोखंडी पिंजरा दुरुस्त करून पुन्हा त्याच ठिकाणी मादी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास लावला
होता. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत वनविभागाचे कर्मचारी नाशिक-पुणे महामार्ग व बेलांबा शिवारात गस्त घालीत होते. मुसळगाव येथे बिबट्याची दहशत कायम तालुक्यातील मुसळगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम आहे. शनिवारी (दि.३१) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गावालगत ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले होते. पोलीसपाटील दीपक गाडेकर यांनी याबाबत वनविभागाच्या अधिकाºयांना माहिती दिली होती. मागील आठवड्यात सुकदेव बोडके, शिवाजी बोडके यांच्या वस्तीजवळ बिबट्या महिलांना दिसला होता. या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.शनिवारी मध्यरात्री अथवा रविवारी पहाटेच्या सुमारास या पिंजºयात चवताळलेली बिबट्या मादी जेरबंद झाली. सकाळी बिबट्याने डरकाळ्या फोडल्यानंतर स्थानिक शेतकºयांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली. त्यामुळे तिसºयांदा लावलेल्या पिंजºयात बिबट्या मादीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. अदांजे चार वर्षे वयाची बिबट्या मादी असल्याचे वनविभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. कर्मचाºयांनी घटनास्थळी जाऊन बिबट्या मादीची रवानगी मोहदरी वनउद्यानात केली आहे. अजूनही या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा संशय शेतकºयांनी व्यक्त केला आहे.

Web Title: ... finally locked in a cage with a female

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.