नाशिक- विकासक आणि बांधकाम इच्छुकांसाठी बहुप्रतिक्षीत सर्वसमावेशक बांधकाम नियमावली (युनीफाईड डीसीपीआर) अखेरीस प्रसिध्द झाली असून प्रसिध्द झाली असून नाशिक मध्ये बांधकाम व्यवसायिक आणि वास्तुविशारदांनी त्याचे स्वागत केले आहे. नाशिककरांच्या दृष्टीने महत्वाचा असलेेला पार्कींग, मार्जिनल स्पेस आणि ॲमेनीटी स्पेस या संदर्भात मेाठा दिलासा मिळाला असल्याने बांधकाम क्षेत्राला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.
गेल्या आठवड्यात युनीफाईड डीसीपीआर मंजुर झाल्याचे जाहिर करण्यात आले असले तरी ही नियमावलीच मंजुर झालेली नसल्याने त्यातील स्पष्टता होत नव्हती. तरीही बांधकाम व्यवसायिकांंनी त्याचे स्वागत केले होते. विधान परिषदेच्या निवडणूकीमुळे नियमावली प्रसिध्द करण्यात अडचण येत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, अखेरीस विधान परीषदेचे निकाल लागतानाच ही नियमावली आज सकाळी प्रसिध्द झाली असून ती विकासकांना प्राप्त झाली आहे.
या नियमावलीत नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे क्रेडाई मेट्रोचे अध्यक्ष रवि महाजन यांनी सांगितले. ॲमेनिटी स्पेस संदर्भात दिलासा देताना आता चार हजार चौरस मीटर पेक्षा अधिक क्षेत्रफळाचा भूखंड असेल तर त्यांनाच अशाप्रकारे ॲमेनिटी स्पेस साठी जागा सेाडावी लागणार असल्याने छोट्या प्लॉटधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे महाजन यांनी सांगितले. वाहनतळाबाबत देखील मोठा दिलासा मिळाला असून पुर्वी प्रमाणे आता मोठ्या प्रमाणात जागा सोडावी लागणार नाही, असेही महाजन म्हणाले.
ज्येष्ठ वास्तुविशारद संजय म्हाळस यांनी या नियमावलीचे स्वागत केले. या नियमावलीमुळे रूग्णालय, शैक्षणिक संस्था, व्यापरी संकुले यासाठी मार्जिनल स्पेस शिथील केल्याने लहन रस्त्यांलगत आणि लहान भूखंडावर देखील असे प्रकल्प राबवणे शक्य हेाणार आहे, असे ते म्हणाले.
नरेडकाेचे संस्थापक सदस्य जयेश ठक्कर यांनी अत्यंत दिलासादायक नियमावली असल्याचे सांगितले. या नियमावलीत आता पार्कींगसाठी ज्यादा जागा सोडावी लागणार नाही, तसेच सायकलसाठी जागा सोडण्याची गरज राहीलेली नाही. बाक्लनी एन्क्लोजरला देखील परवानगी देण्यात आली आहेत. असे खूप नियम सेायीचे असल्याचे ते म्हणाले.