कादवा नदीपात्र कोरडे पडल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती. मात्र, करंजवण धरणातील पाणी कादवा नदीपात्रात सोडल्यामुळे पालखेड धरण क्षेत्रासह कादवा परिसरातील पाणी योजनांना नवसंजीवनी मिळाली आहे.
गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून कादवा नदीपात्र कोरडे पडल्यामुळे कादवा परिसरामध्ये जनावरांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याचप्रमाणे सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग सतत वाढत असल्यामुळे या परिसरामध्ये पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच करंजवण, ओझे, लखमापूर, म्हैळुस्के गावामध्ये अंत्यविधी, राख, दशक्रिया विधी तसेच पिंडदानासाठीसुद्धा कादवा नदीत पाणी राहिले नव्हते. दरम्यान, सोमवारी कादवा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे परिसरासह पालखेड धरणक्षेत्रातील गावांनी समाधान व्यक्त केले आहे.
फोटो -१७ करंजवण डॅम
===Photopath===
170521\17nsk_52_17052021_13.jpg
===Caption===
फोटो -१७ करंजवण डॅम