...अखेरती चा बार्डर ओलांडण्याचा मार्ग खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 11:30 PM2021-03-31T23:30:57+5:302021-04-01T01:00:35+5:30

नाशिक : तीन वर्षांपुर्वी बांग्लादेशातून भारताची ह्यबॉर्डरह्ण मैत्रिणीसोबत ओलांडली अन‌् थेट मायानगरी मुंबई गाठली. मैत्रिणीने घात करत ह्यतीह्णचा तीन लाखांत देहविक्रयचा काळ्या बाजारात मुंबईत सौदा केला. एका पुरुषाने ह्यतीह्णला नाशकात पोहचविले आणि शहर पोलिसांनी पिडित बांग्लादेशी तरुणीला सिडकोतील एका घरातून ताब्यात घेत सुटका केली.

... Finally, the way is open to cross the hybrid | ...अखेरती चा बार्डर ओलांडण्याचा मार्ग खुला

...अखेरती चा बार्डर ओलांडण्याचा मार्ग खुला

Next
ठळक मुद्देजिल्हा व सत्र न्यायालय : देहविक्रयच्या दरीत ढकललेल्या पिडित तरुणीला न्याय

नाशिक : तीन वर्षांपुर्वी बांग्लादेशातून भारताची ह्यबॉर्डरह्ण मैत्रिणीसोबत ओलांडली अन‌् थेट मायानगरी मुंबई गाठली. मैत्रिणीने घात करत ह्यतीह्णचा तीन लाखांत देहविक्रयचा काळ्या बाजारात मुंबईत सौदा केला. एका पुरुषाने ह्यतीह्णला नाशकात पोहचविले आणि शहर पोलिसांनी पिडित बांग्लादेशी तरुणीला सिडकोतील एका घरातून ताब्यात घेत सुटका केली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडधिकारी बी.के.गावंडे यांच्या न्यायालयाने अंतीम सुनावणीत न्यायायलयीन कामकाज संपेपर्यंतची शिक्षा व दोनशे रुपयांचा दंड ठोठावत पिडित तरुणीला मायदेशी पाठविण्याचे आदेश गुरुवारी (दि.३१) दिले.

नोकरीच्या शोधात असताना बांग्लादेशातील बोरिशाल जिल्ह्यात राहणाऱ्या मैत्रीणीने दाखविलेल्या मुंबईच्या ब्युटी पार्लरमधील नोकरीच्या आमीषाला बळी पडत तीने नदीच्या पात्रातून भारत-बांग्लादेशाची सीमा २०१९साली ओलांडली. रेल्वेतून मुंबईत पोहचल्यानंतर संशयित ह्यसाथीह्णने देहविक्रयच्या दलदलीत आणून हात सोडला अन‌् मैत्रीचा विश्वासघात केला. मुंबईतील देहविक्रयचा काळाबाजार चालविणाऱ्या एका ह्यआंटीह्णने तिच्यामार्फत स्वत:ची चांगली ह्यकमाईह्ण करुन घेतली आणि भारताचे तिच्या नावानेच बनावट आधारकार्डही हातात टेकविले अन म्हणाली, ह्यये तु रहने दे अपने पास, काम आयेगा....ह्ण काही महिने पिडितेने या दलदलीत काढले.

एका ग्राहकाने पोहचविले नाशकात एका पुरुषाने तिची मजबुरी हेरली आणि ह्यआंटीह्णच्या हातावर रक्कम देत तासाभरासाठी बाजारातून बाहेर आणले आणि थेट नाशिकला पोहचविले. सिडको भागात एका कुटुंबात ती पंधरा दिवस राहिली. यावेळी अंबड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बांग्लादेशी नागरिक म्हणून पोलिसांनी पिडितेला ताब्यात घेत तिच्याविरुध्द पारपत्र कायदा, परकीय नागरिक कायद्याप्रमाणे विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

...म्हणून पिडितेला दंडाची शिक्षा
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गावंडे यांच्या न्यायालयात झालेल्या अंतीम सुनावणीत पिडितेचे वय आणि तिचा झालेला छळ लक्षात घेता न्यायालयाने तिला माणुसकीच्या भावनेतून पारपत्र कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात दोनशे रुपये दंड व न्यायालयीन कामकाज आटोपेपर्यंतची शिक्षा सुनावली. यावेळी सरकारी वकील ॲड.विद्या देवरे निकम यांनी युक्तीवाद केला. या खटल्यात चार साक्षीदार तपासण्यात आले तसेच तीन महिन्यांमध्ये न्यायालयाने खटल्याचा निकाल देत पिडितेला दिलासा दिला आणि तिला तीच्या मायदेशी पाठविण्याचे आदेश पोलीस व अन्य सरकारी यंत्रणेला दिले.

पोलिसांचा थेट ह्यकंट्री डायरेक्टरह्णसोबत संपर्क
न्यायालयीन आदेशाप्रमाणे पिडित तरुणीच्या पत्त्याची पडताळणी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक (गुन्हे) कमलाकर जाधव यांनी सुरु केली. त्यासाठी पोलिसांनी ह्यकंट्री डायरेक्टर जस्टीस ॲन्ड केअरह्णशी संपर्क साधून पिडित तरुणीच्या पत्त्याबाबत तसेच कुटुंबियाबाबत पडताळणी करण्याची विनंती केली. संबंधितांकडून चौकशी अहवाल प्राप्त झाला आणि या अहवालाद्वारे पिडित मुलीच्या आई-वडिलांचे फोटो तिने ओळखले. तिचे वडील मयत झाले असून आई, भाऊ, बहीणींकडे राहणारी पिडित तरुणी बारावी उत्तीर्ण असल्याचेही पुरावे पोलिसांना मिळाले. न्यायालयाच्या आदेशानंतर पिडित तरुणीला ह्यवात्सल्यह्ण महिला सुधारगृहालयात वर्षभराकरिता ३१जुलैपासून दाखल करण्यात आले होते.

...म्हणुन ह्यबीएसएफह्णचा नकार
न्यायालयाचा प्रत्यार्पणाचा आदेश झाल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे जाधव यांनी तपास सुरु करत पत्रव्यवहार करुन सीमा सुरक्षा दलाशी (बीएसएफ) संपर्क साधला. यावेळी त्यांच्या मुख्यालयाने तीच्याविरुध्द गुन्हा दाखल असल्याने तीला सीमेपार पाठविता येणार नाही, अशी शंका उपस्थित केली. त्यामुळे या गुन्ह्यांतर्गत दोषारोपपत्र दाखल केले गेले आणि न्यायालयात खटला चालविण्यात आला. सरकारी वकील विद्या देवरे-निकम यांनी या खटल्यात महत्वाचे दाखल दिले. तसेच तपासी अधिकारी कमलाकर जाधव यांनी यासाठी परिस्थितीजन्य सबळ पुरावे न्यायालयापुढे सादर केले.

Web Title: ... Finally, the way is open to cross the hybrid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.