फायनान्स कंपनीचा रिक्षाचालकांना जाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:10 AM2021-06-30T04:10:42+5:302021-06-30T04:10:42+5:30

शहरातील रिक्षाचालकांनी रिक्षा घेताना बजाज फायनान्सचे कर्ज घेतले आहे. काही महिन्यांपासून संपूर्ण देशभरात कोरोना महामारीने थैमान घातल्याने लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांचे ...

Finance company scrutinizes rickshaw pullers | फायनान्स कंपनीचा रिक्षाचालकांना जाच

फायनान्स कंपनीचा रिक्षाचालकांना जाच

Next

शहरातील रिक्षाचालकांनी रिक्षा घेताना बजाज फायनान्सचे कर्ज घेतले आहे. काही महिन्यांपासून संपूर्ण देशभरात कोरोना महामारीने थैमान घातल्याने लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांचे आर्थिक नियोजन कोलमडले नियोजनामुळे रिक्षाचालकांना रिक्षावरील कर्जाचे हप्ते नियमित भरता आले नाही. बहुतांश कर्जदारांची कर्जपरतफेडीची प्रामाणिक इच्छा असून, व्यवहार सुरळीत झाल्यावर कर्ज परतफेड करणार आहे. मात्र असे असताना बजाज फायनान्स कंपनी कर्ज घेतलेल्या रिक्षाचालक कर्जदारांना कंपनीकडून होणार्‍या बेकायदेशीर तथा गुन्हेगारी कर्जवसुली पद्धतीला सामोरे जावे लागत आहे. कंपनी वसुली पथक कर्जदारांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे, रात्री कर्जदारांच्या घरी जाऊन आरडाओरड करणे, महिलांशी अर्वाच्च भाषेत बोलणे, महिलांचा नंबर घेऊन त्यांना वारंवार फोन करून त्रास देणे आदी कृत्य सुरु आहे. विशेष म्हणजे वसुली पथकातील अनेक व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .

इन्फो===

कर्ज वसुलीसाठी सर्वोच्च न्यायालय रिझर्व्ह बँकेने मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहे. तरी बजाज फायनान्स कंपनी वसुली पथकाकडून सर्व नियम यांना पायदळी तुडवून बेकायदेशीर कर्जवसुली सुरू आहे. त्रास देणाऱ्या वसुली पथक कंपनी व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्यात यावी.

-मामा राजवाडे, महानगरप्रमुख, श्रमिकसेना

Web Title: Finance company scrutinizes rickshaw pullers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.