चैत्रोत्सव रद्दचा महामंडळाला बसणार आर्थिक फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 08:41 PM2020-03-28T20:41:29+5:302020-03-28T20:43:55+5:30

कळवण : कोरोनामुळे देशभरात उद्योग, व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन गोरगरिबांचे हक्काचे वाहन म्हणून धावणाऱ्या एसटी बसेसलाही फटका बसणार आहे. सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सव रद्द झाल्याने एस.टी.चे तब्बल अडीच कोटी रु पयांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

Financial impact of cancellation of Chaitraotsav will be a financial blow! | चैत्रोत्सव रद्दचा महामंडळाला बसणार आर्थिक फटका!

चैत्रोत्सव रद्दचा महामंडळाला बसणार आर्थिक फटका!

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : अडीच कोटींचे होणार नुकसान; कळवण आगाराला बसणार झळ

मनोज देवरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : कोरोनामुळे देशभरात उद्योग, व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन गोरगरिबांचे हक्काचे वाहन म्हणून धावणाऱ्या एसटी बसेसलाही फटका बसणार आहे. सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सव रद्द झाल्याने एस.टी.चे तब्बल अडीच कोटी रु पयांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
नाशिक विभागात चैत्रोत्सवात परिवहन महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न मिळत असल्याने तोट्यातील महामंडळाला आधार ठरणारा चैत्रोत्सवच रद्द झाल्याने मोठा आर्थिक फटका एसटीला बसणार आहे. खान्देशातील लाखो भाविक भगवतीच्या दर्शनाला गडावर येत असतात.
नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक गडावर येत असल्याने एस. टी. महामंडळाला या यात्रोत्सवाचा मोठा आर्थिक हातभार लागत होता. वर्षभरातील इतर वेळच्या तुलनेत चैत्रोत्सवात मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने एस.टी.ला ही यात्रा महत्त्वाची ठरत असते.
मागील वर्षी चैत्रोत्सवात नाशिक जिल्ह्यातील तीन लाख ६० हजार, धुळे जिल्ह्यातील १ लाख १० हजार तर जळगाव जिल्ह्यातील ८३ हजार अशा एकूण ५ लाख ५३ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. यंदा तर महाराष्ट्रात शेतमालाला चांगला भाव मिळालेला असल्याने व सुटीच्या कालावधीत यात्रा येत असल्याने साडेसहा लाख प्रवासी महामंडळाला अपेक्षित होते.
मागील वर्षी अडीच कोटी रु पये उत्पन्न मिळालेल्या महामंडळाला यंदा पावणेतीन कोटी रु पये उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र कोरोनामुळे प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चैत्रोत्सव रद्द केला असल्याने यंदा महामंडळाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.आगाराचे मोठे नुकसान
आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. चैत्रोत्सव हा आमच्यासाठीही महत्त्वाचा असतो. भाविकांच्या सेवेचे समाधान आनंददायी असते. मात्र यंदा संसर्गजन्य आजारामुळे यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय झाला असल्याने आगाराला आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.
- हेमंत पगार,
आगार व्यवस्थापक, कळवणमागील वर्षी बसफेºया आणि उत्पन्नजिल्हा बस संख्या फेºया उत्पन्न
नाशिक - ४६० ८१८४ १ कोटी २० लाख
धुळे - २५३ १७६३ ६३ लाख
जळगाव - २०२ १६२० ५२ लाख

Web Title: Financial impact of cancellation of Chaitraotsav will be a financial blow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.