प्रतिबंधीत क्षेत्रात फवारणीस अग्निशमन विभागाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 08:54 PM2020-05-23T20:54:59+5:302020-05-23T21:05:56+5:30

मुळातच प्रतिबंधीत क्षेत्रात जंतु नाशकांची फवारणी हे अग्निशमन तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे काम नाही तर जंतु नाशक फवारणी हे वैद्यकिय आणि आरोग्य विभागाचे काम आहे.

Fire department opposes spraying in restricted areas | प्रतिबंधीत क्षेत्रात फवारणीस अग्निशमन विभागाचा विरोध

प्रतिबंधीत क्षेत्रात फवारणीस अग्निशमन विभागाचा विरोध

googlenewsNext
ठळक मुद्देवाहने वैद्यकिय विभागाकडे वर्ग करण्याची मागणीनाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलात ८५ टक्के कर्मचारी

नाशिक : शहरात कोरोनाबाधीतांची संख्या वाढल्यानंतर प्रतिबंधीत क्षेत्र वाढत आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने प्रतिबंधीत क्षेत्रात सोडीयम हायपोक्लाराईडची फवारणी करण्याकरीता अग्निशमन दलाच्या वाहनांचा वापर केला जात आहे. मात्र, त्यासाठी वाहनावरील कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने जीवावर बेतण्याची शक्यता आहे. यामुळे प्रतिबंधीत क्षेत्रात फवारणी करण्यास अग्निशमन विभागाच्या वाहनांचा आणि जवानांचा वापर करू नये अशी मागणी नाशिक महापालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहेत.
महापालिका प्रशासनाला फवारणी करायची असेल तर मिनी वॉटर मिस्ट प्रकारची पाच वाहने आरोग्य वैद्यकिय विभागाकडे वर्ग करून त्या विभागाकडे औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी देखील संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. शहरात कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे एखाद्या क्षेत्रात बाधीत आढळल्यानंतर महापालिकेच्या वतीने सदरच्या रूग्णाच्या घराचा परीसर प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले. त्यानंतर वैद्यकिय विभागातील अधिकारी कर्मचारी अग्निशमन दलाशी संपर्क साधून बंबाच मागणी करतात. विशेषत: या कामासाठी मिनी वॉटर मिस्ट आणि क्यु.आर.व्ही. वाहने मागितली जातात. आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने नसल्याने एखाद्याला कोरोना संसर्ग झाल्यास संपुर्ण अग्निशमन दलच कोरंटाईन करावे लागेल असे निवेदनात म्हंटले आहे. मुळातच प्रतिबंधीत क्षेत्रात जंतु नाशकांची फवारणी हे अग्निशमन तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे काम नाही तर जंतु नाशक फवारणी हे वैद्यकिय आणि आरोग्य विभागाचे काम आहे. त्यातच मालेगावसह काही ठिकाणी अग्निशमन दल कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे.मालेगावी तर एकाचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे अग्निशमन कर्मचा-यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या व्यतिरीक्त अन्य कामे येऊ अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, जगदीश देशमुख, तानाजी जायभावे, वसुधा कराड, नाना गांगुर्डे, प्रमोद लहामगे, संतोष गांगूर्डे, संतोष आगलावे यांनी केली आहे. वयाची पन्नाशी पार केलेल्यांना आजाराचा धोका असल्याने मुख्यमंत्र्यांनी अशी वयोमर्यादा पार करणा-या पोलीसांना बंदोबस्तातून सुट दिली आहे. नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलात ८५ टक्के कर्मचारी हे वयाची पन्नाशी पार केलेले आहेत. त्यामुळे त्यांना संसर्गाची भीती अधिक असल्याचे संघटनेने निवेदनात नमुद केले आहे.

Web Title: Fire department opposes spraying in restricted areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.