पक्ष्यांना जीवदान देण्यासाठी धावतंय अग्निशमन दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:44 AM2021-01-08T04:44:03+5:302021-01-08T04:44:03+5:30

नायलॉन मांजाचा वापर करत पतंगबाजीची हौस भागविणाऱ्यांमुळे पक्ष्यांचा जीव धोक्यात येत आहे, तर दुसरीकडे अग्निशमन दलासारख्या आपत्कालीन यंत्रणेला मानवी ...

Firefighters rush to rescue birds | पक्ष्यांना जीवदान देण्यासाठी धावतंय अग्निशमन दल

पक्ष्यांना जीवदान देण्यासाठी धावतंय अग्निशमन दल

Next

नायलॉन मांजाचा वापर करत पतंगबाजीची हौस भागविणाऱ्यांमुळे पक्ष्यांचा जीव धोक्यात येत आहे, तर दुसरीकडे अग्निशमन दलासारख्या आपत्कालीन यंत्रणेला मानवी संवेदनांची जाणीव ठेवत मुक्या पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी धावावे लागत आहे. नायलॉन मांजा हा जसा पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरतो, तसेच तो मानवी जीवितालाही धोका पोहोचवितो, याचा प्रत्यय नाशिककरांना काही दिवसांपूर्वीच आला. द्वारका परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा नायलॉन मांजाने गळा कापला गेला आणि ती मृत्यूमुखी पडली.

डिसेंबरपासून वर्षभर नाशिक मनपा अग्निशमन दलाच्या शिंगाडा तलाव येथील मुख्यालयासह सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड अशा सर्वच उपकेंद्रांवर त्या-त्या भागातून झाडांवर पक्षी अडकल्याचे दूरध्वनी खणखणत असतात. दुरध्वनीवरून माहिती मिळताच तत्काळ या केंद्रांवरील जवान अग्निशमन बंबासह आवश्यक ती सर्व साधनसामग्री घेत घटनास्थळी धाव घेतात आणि बंबावर उभे राहून लांब बांबूच्या साह्याने आकडा तयार करत पक्ष्याची सुटका करतात, तर कधी निलगिरीसारख्या अधिक उंच झाडावर अडकलेल्या पक्ष्यांच्या सुटकेसाठी हायड्रोलिक शिडी असलेल्या बंबाचीही जवानांकडून मदत घेतली जाते. मागील वर्षी सर्वाधिक २१५ पक्षी शहर व परिसरातून रेस्क्यू करण्यात जवानांना यश आले. ज्या पक्ष्यांचे पंख कापले गेले किंवा पायांना इजा पाेहोचली अशा पक्ष्यांना पक्षिमित्रांकडे पुढील उपचारासाठी जवानांकडून सोपविले जाते.

---इन्फो--

६८ कावळे, ३३कबुतर आणि २७ घारी जखमी

२०२० साली कबुतर- ३३ घुबड-११, कोकीळ-७, साळुंखी-९ वटवाघूळ-११, घार-२७, कावळा-६८ जखमी झाले. तसेच पोपट, पारवा प्रत्येकी १ असे सुमारे २१५ पक्षी नायलॉन मांजामुळे जखमी झाले. या मांजामध्ये अडकून झाडांच्या फांद्यावर तडफडत असलेल्या पक्ष्यांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. यामधील बहुतांश पक्ष्यांना जीवनदान देण्यास जवानांना यश आले असले तरी काही पक्षी कायमस्वरूपी अपंग झालेत.

--इन्फो--

महिनानिहाय पक्षी जखमी होण्याच्या घटना अशा

वर्ष: २०२० : जानेवारी-४२/ फेब्रुवारी-२४/ मार्च ३६/एप्रिल-१९/ मे-१९/जून-१८/ जुलै-७/ऑगस्ट-४/सप्टेंबर-१०/ ऑक्टोबर१०/ नोव्हेंबर-१३ डिसेंबर-१३

--

फोटो आर वर ०६फायर१/२/३

Web Title: Firefighters rush to rescue birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.