अकरावी प्रवेशासाठी अाता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:27 PM2018-08-27T12:27:12+5:302018-08-27T12:28:48+5:30
अकरावी प्रवेशप्रक्रियेत १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी आता सोमवारपासून (दि.२७) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या चार नियमित फेऱ्यांनंतर एक विशेष फेरी पूर्ण झाली असून, आतापर्यंत सुमारे १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यासाठी २५ आॅगस्टला रिक्त जागांची यादी जाहीर झाली असून, आतापर्यंत प्रथम पसंतीचे प्रवेश मिळवूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसह ज्यांना आतापर्यंत झालेल्या ५ फेऱ्यांमध्ये आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळू शकलेली नाही असे ८० टक्के व त्याहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.
नाशिक : अकरावी प्रवेशप्रक्रियेत १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी आता सोमवारपासून (दि.२७) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या चार नियमित फेऱ्यांनंतर एक विशेष फेरी पूर्ण झाली असून, आतापर्यंत सुमारे १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यासाठी २५ आॅगस्टला रिक्त जागांची यादी जाहीर झाली असून, आतापर्यंत प्रथम पसंतीचे प्रवेश मिळवूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसह ज्यांना आतापर्यंत झालेल्या ५ फेऱ्यांमध्ये आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळू शकलेली नाही असे ८० टक्के व त्याहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील ५८ महाविद्यालयांमधील सुमारे २७ हजार ९०० जागांपैकी आतापर्यंत १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, जवळपास १३ हजार ३०० विद्यार्थी अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. यात पहिल्या फेरीपासून ते पाचव्या फेरीपर्यंत प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यामुळे असे विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेतून बाद झाले होते. त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ निर्माण झाली होती. परंतु, शिक्षण विभागाने अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा संधी उपलब्ध करून दिली असून, २७ आॅगस्टला पहिल्या टप्प्यात ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. तर २९ आॅगस्टला उपलब्ध जागांवर ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना व ३१ आॅगस्टला सर्व दहावी पास विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.