पोस्टल विभागात सिन्नर तालुका जिल्ह्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:19 AM2021-08-19T04:19:42+5:302021-08-19T04:19:42+5:30
सिन्नर : पोस्टल विभागात पी.एल.आय.व.आर.पी.एल.आय.चे उद्दिष्ट सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात सिन्नर तालुक्यातील चार कर्मचारी वर्गाने उत्कृष्ट काम केल्याबद्दल ...
सिन्नर : पोस्टल विभागात पी.एल.आय.व.आर.पी.एल.आय.चे उद्दिष्ट सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात सिन्नर तालुक्यातील चार कर्मचारी वर्गाने उत्कृष्ट काम केल्याबद्दल नासिक जिल्ह्याचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
पोस्टल विभागात आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यालयात पोस्टाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कर्मचारी वर्गाची धावपळ सुरू असते. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात पी.एल.आय. व आर.पी.एल.आय.च्या सर्वात जास्त कामात नांदूर शिंगोटे एस. ओ.च्या गोंदे बी.ओ.चे. पोस्टमास्तर विजय तांबे यांचा प्रथम क्रमांक, सिन्नर पोस्ट कार्यालयातील जया मुरकुटे यांचा दुसरा, नांदूरशिंगोटेचे पोस्टमास्तर अमोल गंवादे यांचा तिसरा आणि मुसळगाव बीओच्या पोस्टमास्तर माधुरी वाघमारे यांना चौथा क्रमांक मिळाला आहे.
नाशिक जिल्ह्याचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी या सर्वांचे प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्वांचे सहायक अधीक्षक संदीप पाटील, पोस्टमास्तर नीलेश कपिले, गणेश जगताप, संजय शिंदे, मनोज निरगुडे, वाईद पठाण, एकनाथ बेदाडे, धनंजय शहाणे, किशोर बोरसे, बाळासाहेब दराडे, ज्ञानेश्वर घोडे, ज्ञानदेव झगडे, विलास सांगळे, सुरेश अनवट, साहेबराव डावरे, सोपान गंगावणे आदी उपस्थित होते.
(१८ सिन्नर २)
सिन्नर पोस्ट कार्यालयातील जया मुरकुटे यांचा सत्कार करताना मोहन अहिरराव, संदीप पाटील आदी.