वाडीवºहे : इगतपुरी पावसाचे माहेर घर आहे या तालुक्यात अनेक धरणांनी सरासरी गाठली असून जवळपास सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरले आहेत.धरणांचे कोठार असलेल्या इगतपुरी तालुक्यावर यावर्षी वरूण राजाने आपला वरदहस्त कायम ठेवला आहे. विशेष व उल्लेखनीय बाब म्हणजे मोठया धरण प्रकल्पामध्ये समाविष्ट असलेले मुकणे धरण ही यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले असून या धरणाच्या ऊंचीवाढी नंतर हे धरण पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरले आहे, त्यामुळे पावसाचा हा विक्र म मुकणे धरणालाही वरदान ठरला.गोदावरी खोरे अंतर्गत व नादुरमध्यमेश्वर प्रकल्पाअंतर्गत मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी इगतपुरी तालुक्याच्या मुकणे शिवारात हे मुकणे धरण बांधण्यात आले. जवळपास दहा ते बारा वर्षे बांधकाम सुरु होते त्यानंतर सन २००४ नंतर या धरणात जलसाठा संचित करण्यास सुरु वात झाली. मात्र जवळपास साडे सात टीएमसी क्षमतेचे मोठे धरण व धरणाला पाण्याचा स्रोत कमी असल्याने हे धरण इतिहासात कधीच पूर्ण क्षमतेने भरलेले नव्हते.तालुक्यात पावसाने सरासरी गाठली तरीही साठ ते सत्तर टक्केच अंतिम जलसाठा होत होता. परंतु यावर्षी मात्र पावसाने कमी कालावधीत विक्र मी पाऊस झाला. अशा स्थितीत तालुक्यात अवघ्या दीड महिन्यात एकूण सरासरीच्या तुलनेपेक्षा जास्त अर्थात १३० टक्के असा विक्र मी पाऊस झाल्याने मुकणे धरणात ही झपाट्याने जलसाठा वाढत गेला व यावर्षी मुकणे धरण पूर्ण क्षमतेने भरले हा नवीन विक्र म साधला गेला.या धरणाचा सर्वाधिक फायदा मराठवाडा विभागाला होत आहे. नादुरमध्यमेश्वर प्रकल्पाद्वारे या धरणाचे पाणी जायकवाडीला पोहचते. यावर्षी या धरणात आजही ९७ टके पाणीसाठा ठेवून ३३०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला.या धरणातून यावर्षी नाशिक शहराला ही पाणी पुरवठा होणार आहे. नाशिक शहरासाठी पाणी आरक्षित झाल्याची माहिती सबंधित विभागाने दिली आहे.(फोटो २८ मुकणे)
मुकणे धरण ऊंची वाढीनंतर पहिल्यांदाच पुर्ण भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 5:52 PM
वाडीवºहे : इगतपुरी पावसाचे माहेर घर आहे या तालुक्यात अनेक धरणांनी सरासरी गाठली असून जवळपास सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. धरणांचे कोठार असलेल्या इगतपुरी तालुक्यावर यावर्षी वरूण राजाने आपला वरदहस्त कायम ठेवला आहे. विशेष व उल्लेखनीय बाब म्हणजे मोठया धरण प्रकल्पामध्ये समाविष्ट असलेले मुकणे धरण ही यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले असून या धरणाच्या ऊंचीवाढी नंतर हे धरण पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरले आहे, त्यामुळे पावसाचा हा विक्र म मुकणे धरणालाही वरदान ठरला.
ठळक मुद्दे पावसाचा हा विक्र म मुकणे धरणालाही वरदान ठरला.