...यंदा प्रथमच बाप्पा निघाले एसटीतून; पंचवटी आगाराचा मूर्ती संकलन रथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 02:06 PM2020-09-01T14:06:11+5:302020-09-01T14:06:29+5:30

नाशिक शहरामध्ये यावर्षी गणेशोत्सव अगदी साधेपणाने पार पडला दरम्यान आज अनंतचतुर्दशीच्या मुहूर्तावर नाशिक करण कडून जड अंतकरणाने लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे

For the first time this year, Bappa went in ST of Nashik City | ...यंदा प्रथमच बाप्पा निघाले एसटीतून; पंचवटी आगाराचा मूर्ती संकलन रथ 

...यंदा प्रथमच बाप्पा निघाले एसटीतून; पंचवटी आगाराचा मूर्ती संकलन रथ 

googlenewsNext

अझहर शेख

नाशिक : ' एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास'अशी हमी देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या पंचवटी आगाराकडून चक्क लाडक्या गणराया यांच्या विसर्जना निमित्त मोफत मूर्ती संकलन सेवा पुरविली जात आहे कोरोना काळात सुरक्षित रित्या बाप्पाचे विसर्जन व्हावे, आणि सामाजिक अंतर यावेळी राखले जावे या उद्देशाने थेट पंचवटी आगाराकडून मोफत मुर्ती संकलन सेवा देणारा 'एसटी रथ' रस्त्यावर आणला गेला आहे. नाशकात प्रथमच अशाप्रकारे एसटीतून बाप्पांचा विसर्जनाचा प्रवास बघावयास मिळत आहे. 

नाशिक शहरामध्ये यावर्षी गणेशोत्सव अगदी साधेपणाने पार पडला दरम्यान आज अनंतचतुर्दशीच्या मुहूर्तावर नाशिक करण कडून जड अंतकरणाने लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे शहरात कोठेही कुठल्याही प्रकारची गर्दी, गोंधळ आणि बेशिस्तपणा यंदा दिसून येत नाही. नाशिककर गणेशभक्तांनी स्वयमशिस्तीचे पालन करत सामाजिक आंतर राखत कोरोनापासून बचावाचे शासनाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करत बाप्पांचे विसर्जनावर भर दिला आहे. शहरातील विविध गृहनिर्माण सोसायटी अपार्टमेंट इमारती मध्ये आधुनिक रित्या प्रत्येकच अनेकींच्या गणेशमूर्ती एकत्रित संकलित करून त्यांचे वाहन तळ्यामध्ये विसर्जन करण्यात येत आहे या मूर्ती महापालिकेच्या मूर्ती रथ एसटीच्या मूर्ती संकलन रथात गणेश मूर्ती दान करत आहेत. 

विसर्जनाच्या निमित्ताने मूर्ती व निर्माल्य संकलनकरिता नाशिक महापालिकेकडून तब्बल दोनशे वाहने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच एसटी महामंडळाने यंदा आगळावेगळा प्रयोग करत पंचवटी आगाराकडून मूर्ती संकलन रथ स्त्यावर उतरविल्याने एसटी प्रशासनाने देखील कौतुक होत आहे. गणेश भक्ताकडून आपल्या बापाला थेट एसटीतून विसर्जन स्थळापर्यंत पोहचविले जात आहे. पंचवटी परिसरामध्ये एसटीचा हा मूर्ती संकलन रथ आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे ओपन चेसी असलेल्या एसटीच्या लाल पिवळ्या रंगाच्या वाहनला चारही बाजूंनी 'गणेश मूर्ती संकलन रथ' असे फलक लावण्यात आलेले आहे तसेच "लक्षात ठेवा एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास" असे घोषवाक्य देखील या फलकांवर अधोरेखित करण्यात आलेले आहे. यामुळे एसटीचा हा 'गणेश मूर्ती संकलन रथ' लक्षवेधी ठरत आहे.

या कोरोना काळात सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणेश मुर्ती एसटी महामंडळाच्या मुर्ती संकलन रथात जमा कराव्यात त्या मूर्ती अगदी सुरक्षिरित्या विसर्जन स्थळापर्यंत पोहचविल्या जातील असे आवाहन पंचवटी एसटी आगार प्रमुखांनी केले आहे।

Web Title: For the first time this year, Bappa went in ST of Nashik City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.