संक्रांतीच्या दिवशी पोलिसांनी केली कत्तलीच्या पाच जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 04:22 PM2018-01-14T16:22:23+5:302018-01-14T16:26:34+5:30
नाशिक : मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगरच्या दर्ग्याजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी उपाशी बांधून ठेवलेल्या पाच गो-ह्यांची शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने रविवारी (दि़१४) ऐन संक्रांतीच्या दिवशी मुक्तता करून त्यांना जीवदान दिले़

शहर गुन्हे शाखा युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे व सहायक पोलीस उपनिरीक्षक पळशीकर यांना भारतनगर दर्ग्याजवळील पत्र्याच्या शेडमध्ये पाच गो-हे कत्तल करण्यासाठी उपाशीपोटी बांधून ठेवल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि.१४) या पत्र्याच्या शेडमधील पाचही गो-ह्यांची मुक्तता केली़ या प्रकरणी संशयित रफिक जाफर कुरेशी (रा. वडाळागाव, म्हाडा वसाहत) विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस उपनिरीक्षक पोपट कारवाळ, जाकीर शेख, हवालदार बाळासाहेब दोंदे, अनिल दिघोळे, संजय मुळक, चंदू माळोदे, पोलीस नाईक आसीफ तांबोळी, मोहन देशमुख, शिपाई गणेश वडजे, स्वप्नील जुंद्रे, प्रवीण चव्हाण, राहुल पालखेडे, प्रतिभा पोखरकर, दीपक जठार आदींनी या कारवाईत सहभाग घेतला़