नाशिक : राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने सापळा रचून दिंडोरी तालुक्यातील ननाशी-भनवड रोडवर मद्याची चोरटी वाहतूक करणारी दोन चारचाकी वाहने व मद्य असा ४ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल शनिवारी (दि़१७) जप्त केला़ याप्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे़राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांना अवैध मद्याची चोरटी वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ननाशी-भनवड रस्त्यावर सापळा रचला होता.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही वाहनातून देशी दारूच्या एक हजार ५८४ बाटल्या जप्त केल्या असून वाहने व देशीदारुचा साठा असा ४ लाख ८२ हजार ३६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.निरीक्षक एम. बी. चव्हाण, दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे, एस.एस. रावते, कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली़ओम्नीचा चालक फराररात्रीच्या सुमारास या रस्त्यावरून जाणाºया पांढºया रंगाची मारुती इक्को कार (एमएच १५ जीए ०९१५) व पांढºया रंगाची ओम्नी कार (एमएच १२ जीआर ३७२२) ही वाहने अडविली. यावेळी मारुती कारचा चालक संशयित सनी सदाशिव सारसल यास ताब्यात घेण्यात आले तर ओम्नीचा चालक संशयित आप्पा प्रल्हाद शिंगाडे मात्र पसार झाला.
ननाशी शिवारात पाच लाखांचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:17 AM
राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने सापळा रचून दिंडोरी तालुक्यातील ननाशी-भनवड रोडवर मद्याची चोरटी वाहतूक करणारी दोन चारचाकी वाहने व मद्य असा ४ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल शनिवारी (दि़१७) जप्त केला़ याप्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे़
ठळक मुद्देएकास अटक : उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची कामगिरी