‘त्या’ महिलेच्या कुटुंबातील पाच सदस्यही बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 06:18 PM2020-07-06T18:18:29+5:302020-07-06T18:18:50+5:30
नामपूर : येथील योगयोग चौकामधील ६७ वर्षीय महिला शुक्र वार (दि.३) रोजी बाधित असल्याचे निष्पन्न झाले. आरोग्य विभागाने तत्परता दाखवत तिच्या कुटूंबातील ९ व्यक्तींना अजमेर सोंदाणे येथील विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले होते. त्या व्यक्तींच्या घशाचे स्त्राव घेऊन शनिवारी (दि.४) रोजी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल रविवार (दि.5) रोजी प्राप्त झाला. यात पाच व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाल्याने शहरवासियांच्या चिंतेत भर पडली आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये ८०वर्षीय पुरुष, ३८वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, १२ वर्षीय बालिका व ४ वर्षीय बालकाचा समावेश आहे.
नामपुर शहरातील कोरोनाग्रस्त व्यक्तींची संख्या पाचने वाढल्याने एकुण बाधितांची संख्या ७ झाली आहे. एक युवक कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच उपचार घेत असलेल्या रु ग्णाची तब्येत ठणठणीत असल्याने कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नये. अन्यथा कलम १४४ अन्वये गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी सांगितले. बऱ्याच दिवसानंतर नामपूरला बाधित रुग्ण आढळून आल्याने नागरिकात भीती व्यक्त होत आहे. कोरोनाने जिल्'ात शिरकाव केल्याच्या प्रारंभी एका वैद्यकीय अधिकाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर नागरिकांनी योग्य ती काळजी घेत संसर्ग थांबविला होता. आता दोन आठवड्यांपासून कोरोनाने डोके वर काढल्याने आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे.