ओझर : सध्या नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा संशयित रु ग्ण सापडल्याने सर्वत्र नाकाबंदी केली आहे. त्यातच हिमाचल प्रदेशामधून कामधंद्यासाठी आलेले दोनशे ते अडीचशे नागरिक अडकून पडले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ओझर येथील कालिका मित्रमंडळाच्या वतीने या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. मंडळाचे सोमनाथ जाधव व प्रशांत अक्कर यांनी सर्व धान्य व पीठ, मिठ, मिरचीपासून तांदळापर्यंत वस्तू उपलब्ध करून दिल्या. ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनाही मदतीला घेऊन जानोरी रोड (दहावा मैल ) येथे शासनाच्या नियमांचे पालन करून या नागरिकांची भूक भागवली.
ओझरच्या कालिका मित्रमंडळातर्फे अन्नदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 11:07 PM