...अखेर वन्यजीवांविषयी वनविभागाने दाखविली ‘आस्था’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:13 AM2020-12-25T04:13:47+5:302020-12-25T04:13:47+5:30

‘रोडकिल’च्या घटना नाशिक पश्चिम भागातील राज्य, राष्ट्रीय रेसर महामार्गावर वारंवार घडतच आहे. याबाबत अनेकदा वन्यजीवप्रेमींकडून ओरड केली जाते; मात्र ...

... Forest Department finally shows 'faith' in wildlife | ...अखेर वन्यजीवांविषयी वनविभागाने दाखविली ‘आस्था’

...अखेर वन्यजीवांविषयी वनविभागाने दाखविली ‘आस्था’

Next

‘रोडकिल’च्या घटना नाशिक पश्चिम भागातील राज्य, राष्ट्रीय रेसर महामार्गावर वारंवार घडतच आहे. याबाबत अनेकदा वन्यजीवप्रेमींकडून ओरड केली जाते; मात्र वनविभागाकडून याबाबत तातडीने दखल घेतली जात नव्हती. सावधगिरीचा इशारा देणारे फलक लावल्यानंतर वन्यजीवांचे अपघात थांंबतील, असे नसले तरीदेखील जनप्रबोधन होऊन किमान यामध्ये घट तरी येईल, असा आशावाद व्यक्त होत आहे.

वन्यजीव सप्ताहपुरते केवळ वन्यजीव वाचविण्याचा कळवळा दाखवुन उपयोग नसून वन्यजीव वाचविण्यासाठी वनविभागाकडून विविध उपाययोजना वेळोवेळी होणेदेखील तितकेच गरजेचे आहे.नाशिक पश्चिम वनविभागातील नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या चार वनपरिक्षेत्रांमधील विविध राज्य, राष्ट्रीय महामार्गांवर वन्यजीवांना अज्ञात वाहनांच्या धडकेत जीव गमवावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने बिबट्या, कोल्हा, तरस यांसारख्या वन्यजीव बळी ठरतात. ‘लोकमत’ने याबाबत सचित्र वृत्त प्रसिध्द केल्यानंतर वनविभागाने तातडीने नाशिक वनपरिक्षेत्रातील मुंबई-आग्रा महामार्गालगत रायगडनगर, इगतपुरीजवळ नाशिक- पुणे महामार्गावरील मोहदरी घाटाच्या प्रारंभी तसेच सिन्नर-घोटी राज्य मार्गावर आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महिरावणी, वासाळी, पेगलवाडी गावाजवळ ‘वन्यजीवांचा वावर, वाहने हळु चालवा’ असे फलक सचित्र उभारले आहेत.

--इन्फो--

‘इको-एको’ही सरसावली

‘लोकमत’चे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील इको-एको वन्यजीव संस्थेनेही पुढाकार घेत फलक उभारणीसाठी पुढचे पाऊल टाकले आहे. या संस्थेने त्र्यंबकेश्वर मार्गावर पहिल्या टप्प्यात चार फलक उभारले आहेत. दुसऱ्या टप्प्यात मुंबई-आग्रा महामार्ग आणि त्र्यंबक-जव्हार, पेठ राज्यमार्गांवर फलक लावण्यात येणार असल्याची माहिती वैभव भोगले यांनी दिली. सध्या उभारण्यात आलेले फलकांचे वैशिष्ट्य म्हणजे ते रात्रीच्यावेळी वाहनांच्या प्रकाशात लख्खपणे डोळ्यांपुढे सहज चमकतो. या फलकांसाठी वापरण्यात आलेले ‘रिफ्लेक्टर’ आणि ‘रेडियम’ हे जास्त दिवस टिकणारे असल्याचा दावा या संस्थेकडून करण्यात आला आहे.

---

फोटो आरवर २४फॉरेस्ट आणि २४ फॉरेस्ट१ नावाने सेव्ह आहे.

Web Title: ... Forest Department finally shows 'faith' in wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.