नाशिक : कालिदासच्या नूतनीकरणानंतर गतवर्षी करण्यात आलेल्या सुधारित नियमावलीतील अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्तीचा मुद्दाच व्यावसायिक नाट्यनिर्माते, नाट्यव्यावसायिक आणि प्रथितयश कलाकारांच्या रोषाचे कारण ठरत आहे. त्यामुळे या सुधारित नियमावलीतील असे घातकी नियम बदलण्याची आवश्यकता असल्याचा सर्वांचा सूर आहे.कालिदासच्या नूतनीकरणानंतर दालनासाठी पूर्णपणे नवीन अशी सुधारित नियमावली लागू करण्यात आली. या सुधारित नियमावलीत हा डिपॉझिटचा जाचक नियमटाकण्यात आला आहे. जुन्या नियमावलीत हा नियम वेगळा होता. मात्र, सुधारित नियमावली तयार करताना हा नियम का बदलण्यात आला? त्याबाबत केवळतत्कालीन आयुक्तांच्या आदेशाकडे अंगुलीनिर्देश केला जातो. मात्र, नियमावलीतील त्रुटी दूर करण्याबाबत काहीच हालचाल होत नाही.संबंधित संस्थेने त्यांचे नाटक करताना किंवा कार्यक्रम करताना जर सभागृहाचे काही नुकसान केले, तर ते भरून घेण्यासाठी महापालिकेला किंवा कालिदास व्यवस्थापनाला संबंधित आयोजकांच्या मागे फिरावे लागू नये. यासाठी डिपॉझिट घेण्याची पद्धत असते. जेव्हा कोणतेही सभागृह नीटपणे वापरून कार्यक्रम संपतो, त्यावेळी नियमानुसार त्याचे डिपॉझिट परत करणे आवश्यक असते किंवा जर कार्यक्रमच रद्द झाला तर भाडे किंवा निम्मे भाडे घेऊन डिपॉझिटची रक्कम परत करणे असाच सर्वसाधारणपणे नियम असतो. (क्रमश:)कालिदासची सुधारित नियमावलीसुधारित नियमावलीतील डिपॉझिटबाबतच्या अटींमधील बदल पुढीलप्रमाणे आहेत. आयोजकांनी आरक्षणाकरिता अनामत रक्कम आणि कार्यक्रमाच्या सत्राचे संपूर्ण भाडे जमा केल्यानंतर कार्यक्रमाचे आरक्षण देण्यात येईल. तसेच कार्यक्रमासाठी केलेले आरक्षण रद्द करायचे झाल्यास कार्यक्रमासाठी भरण्यात आलेली अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त करण्यात येईल. तसेच भाडे रकमेचा परतावा पुढीलप्रमाणे असेल. कार्यक्रमापूर्वी १५ दिवस अथवा त्यापेक्षा कमी असेल तर भाडे किंवा अनामत हे निरंक अर्थात काहीच परत मिळणार नाही. कार्यक्रमापूर्वी १६ ते २१ दिवस आधी कळवल्यास भाडे ५० टक्के परत मात्र डिपॉझिट जप्त, कार्यक्रमापूर्वी २२ ते ३० दिवस कळवल्यास भाडे ७५ टक्के मात्र, डिपॉझिट जप्त तर ३१ दिवस किंवा त्यापेक्षा आधी कळवल्यास भाडे १०० टक्के भाडे परत मात्र डिपॉझिट जप्त.जुनी नियमावलीअर्जदारांना घेतलेली तारीख, सत्र कुठल्याही कारणास्तव रद्द केले अथवा बदलून मागितले तर पुढीलप्रमाणे अनामत रक्कम (डिपॉझिट) परत केली जाईल. प्रयोगापूर्वी ६० दिवस आधी कळवल्यास ९० टक्के रक्कम परत, ४५ दिवस कळवल्यास ८० टक्के परत, ३० दिवस आधी कळवल्यास ७० टक्के रक्कम, १५ दिवस आधी कळवल्यास ६० टक्के, प्रयोगापूर्वी ८ दिवस कळविल्यास ५० टक्के रक्कम परत. त्यानंतर कळविल्यास अनामत एकूण भाड्याच्या ७५ टक्के रक्कम जप्त होईल. अशावेळी भाडे पुढे वर्ग करता येईल. कोणत्याही सबबीवर भाडे परत मिळणार नाही.
अनामत रकमेची जप्तीच ठरते कळीचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 1:40 AM