चेक बाउन्सप्रकरणी नगरसूलच्या माजी उपसरपंचाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 11:29 PM2020-09-02T23:29:08+5:302020-09-03T01:46:29+5:30

येवला : तालुक्यातील नगरसूल येथील संत जनार्दन नागरी सहकारी पतसंस्थेने दाखल केलेल्या दाव्याचा येवला न्यायालयाचा निकाल निफाड जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे चेक बाउन्सप्रकरणी नगरसूलचे उपसरपंच नवनाथ बागल यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Former Municipal Deputy Magistrate arrested in check bounce case | चेक बाउन्सप्रकरणी नगरसूलच्या माजी उपसरपंचाला अटक

चेक बाउन्सप्रकरणी नगरसूलच्या माजी उपसरपंचाला अटक

Next
ठळक मुद्देदोन लाख १२ हजाराच्या चेक बाउन्स प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

येवला : तालुक्यातील नगरसूल येथील संत जनार्दन नागरी सहकारी पतसंस्थेने दाखल केलेल्या दाव्याचा येवला न्यायालयाचा निकाल निफाड जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे चेक बाउन्सप्रकरणी नगरसूलचे उपसरपंच नवनाथ बागल यांना पोलिसांनी अटक केली आहे.
संत जनार्दन नागरी सहकारी पतसंस्थेने २०१४ मध्ये बागल यांच्यावर दोन लाख १२ हजाराच्या चेक बाउन्स प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. येवला न्यायालयाने बागल यांना शिक्षाही सुनावली होती. या प्रकरणी बागल यांनी निफाड जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस.पी. घुगे, आर.एन. कांबळे आदींनी शोध घेऊन नगरसूल येथून बागल यांना अटक केली. बागल यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून, नगरसूल परिसरात या अटकेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, संत जनार्दन नागरी सहकारी पतसंस्थेच्या संदर्भात सहकार विभागामार्फतही चौकशी सुरू असून, याबाबतही लवकरच निर्णय होणार असल्याची चर्चा आहे.चेक बाउन्सप्रकरणी वेळोवेळी सुनावणी होऊन निफाड सत्र न्यायालयाने येवला न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. मात्र या निकालाच्या वेळी बागल गैरहजर राहिल्याने न्यायालयाने फरार असल्याचे जाहीर करून तालुका पोलिसांवर अटकेची जबाबदारी सोपविली होती.

Web Title: Former Municipal Deputy Magistrate arrested in check bounce case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.