---------------------
ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांसाठी निधी
सिन्नर : ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत सिन्नर विधानसभा मतदार संघात समावेश असलेल्या ६ देवस्थानांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ५४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या देवस्थानच्या विकासात भर पडण्यास मदत होणार असल्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
-------------------
मनेगाव ग्रामपंचायतीची धडक कारवाई
सिन्नर : तालुक्यातील मनेगाव ग्रामपंचायतीने पाणीपट्टी व अन्य करसवुलीसाठी कडक धोरण राबवले आहेत. १७ थकीत करदात्यांच्या नळांना सील ठोकले आहे. त्यामुळे अन्य करदाते खडबडून जागे झाले आहेत. त्यामुळे करभरणा करण्याला प्रतिसाद मिळाला. काहींनी दोन - चार दिवसांची मुदत मागितली आहे.
-------------------
डुबेरेत कोरोना विषाणूबाबत जनजागृती
सिन्नर : तालुक्यातील डुबेरे ग्रामपंचायत व आरोग्य विभागातर्फे कोरोना जनजागृती दिन पाळण्यात आला. यावेळी जनजागृती फेरी काढून ग्रामस्थांना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. ‘नियम पाळा, कोरोना टाळा’, असे आवाहन करण्यात आले.
-------------------
दापूर, नळवाडीत विकासकामांसाठी निधी
नांदूरशिंगोटे : नागरी सुविधा व तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत सिन्नर तालुक्यातील चास जिल्हा परिषद गटातील दापूर व नळवाडी येथे विकासकामे मंजूर झाली आहेत. त्यासाठी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांनी दिली.
-------------------
कांद्याचा उत्पादन खर्च निघेना
सिन्नर : बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून लाल व उन्हाळ असे दोन्ही प्रकारचे कांदे दाखल झाले आहेत. तसेच कांदा दरातही मोठी घसरण झाली आहे. सध्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.