मालेगाव : शहरातील आणखी चार रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत मन्सुरा हॉस्पिटलमधून त्यांना निरोप देण्यात आला. रविवारी तीन जण कोरोनामुक्त झाले होते त्यामुळे आता मालेगावातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७ झाली आहे.वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देत, ४ बाधित रुग्णाचे नंतरचे सर्व चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. कोरोनामुक्त झालेल्या चारही कोरोनामुक्त नागरिकांना दुपारी ४ वाजेनंतर मन्सुरा हॉस्पिटल येथून निरोप देण्यात आला.दरम्यान, सोमवारी जिल्ह्यातील ४४० नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी ४३९ अहवाल निगेटिव्ह आहेत. मालेगाव येथील एक अहवाल पॉझिटिव्ह असून, तो यापूर्वी बाधित ठरलेल्या रुग्णाचा दुसरा अहवाल आहे.आजपासून लॅब कार्यान्वितनाशिक : येथे कोरोना संशयितांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यासाठी मंगळवारपासून (दि. २८) लॅब कार्यान्वित होणार आहे. या लॅबमध्ये एका मशीनवर दिवसाला १८० नमुन्यांची तपासणी होऊ शकेल. दुसऱ्या मशीनचे कॅलिब्रेशन करून त्याची क्षमता ३६० वर नेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
मालेगाव येथील आणखी चार कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 2:12 AM