काजीसांगवी : येथील आरोग्य केंद्रात कुंटुब कल्याण शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांना सेप्टीक झाल्याचा धक्कादयक प्रकार समोर आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच सेप्टीक झाल्याचा आरोप रु ग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.येथील आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून परिसरातील बहुतांशी रु ग्ण उपचारासाठी येथे येत असतात. पंरतु केद्रातंर्गत काजीसांगवीसह, सोनीसांगवी, वाहेगावसाळ, उर्धुळ, हिवरखेडे या पाच उपकेंद्रांचा समावेश आहे. कुंटुबकल्याण शस्त्रक्रिया काजीसांगवी आरोग्य केंद्रात होतात. महिन्याच्या एका आठवड्यात शस्त्रक्रिया कॅम्प घेतला जाते. त्यानुसार दि. ७ फेबु्रवारी रोजी परिसरातील एकुण नऊ रु ग्णांवर कुंटुबकल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. केली होती. परंतु त्यातील हिवरखेडे येथिल कविता सुनील भोईटे (२५),विटावे येथील सविता कैलास गांगुर्डे(२५),कोलटेक येथील सुनिता संजय सोनवणे (२७) आणि पुजा संतीश बर्डे(२८) या चार रु ग्णांना शस्त्रक्रियेनंतर सेप्टीक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर व्यवस्थित वैद्यकीय उपचार झाले नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे सेप्टीक झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असुन हे चारही रु ग्ण आरोग्य केंद्रात पुन्हा उपचारासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, या आरोग्य केंद्राबाबत अनेक तक्रारी असून त्याकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. योग्य उपचार चालु कुंटुबकल्याण शस्त्रक्रिया झाल्यानंतर तीन दिवसांनी या रु ग्णांना घरी सोडण्यात आले होते परतु यातील चार रुग्णांनाच सेप्टीक झाल्याने त्यांना परत दाखल करु न त्यांच्यावर योग्य उपचार चालु आहेत. शस्त्रक्रिया सेप्टीक कशाने झाली याविषयी सर्व बाबीच्या तपासण्या आम्ही करीत आहोत.- पंकज ठाकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी
कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांना झाले सेप्टीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 6:43 PM
धक्कादायक : काजीसांगवी आरोग्य केंद्रातील प्रकार
ठळक मुद्देवैद्यकीय उपचार झाले नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे सेप्टीक झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असुन हे चारही रु ग्ण आरोग्य केंद्रात पुन्हा उपचारासाठी दाखल झाले आहेत.