टोइंगसाठी चार टेम्पो, तीन क्रेन लवकरच ‘ऑन रोड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:12 AM2021-06-20T04:12:17+5:302021-06-20T04:12:17+5:30
--इन्फो-- बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडी शहरात वाहनांची संख्या वाढल्याने वाहनतळाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच काही वाहन चालक ...
--इन्फो--
बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
शहरात वाहनांची संख्या वाढल्याने वाहनतळाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच काही वाहन चालक बेशिस्तरित्या वाहने पार्क करीत असल्याने वाहतूक कोंडी हाेऊन अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. टोइंग व्हॅन कारवाईबाबत हरकती, समस्या, सूचना असल्यास त्या नोंदवण्यासाठी नागरिकांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र या कालावधीत अवघ्या दोन सूचना प्रशासनाला प्राप्त झाल्या. त्यावर अंमलबजावणी करून आता कार्यारंभ आदेश काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. -
--इन्फो--
...असे असणार टोइंगच्या दंडाचे दर
दुचाकी वाहने : एकूण २९० रुपये ( टोइंग दर- ९० व शासकीय शुल्क २०० रु.)
चारचाकी वाहने : एकूण ५५० रुपये ( टोइंग दर- ३५० व शासकीय शुल्क २०० रु.)