दसककर भगिनींच्या हार्मनी अन‌् सिम्फनीचा अत्तरी सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:11 AM2021-07-18T04:11:06+5:302021-07-18T04:11:06+5:30

नाशिक : सोशल मीडियावर तीन वर्षांपूर्वी ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’ हे गाणं हार्मनी प्रकारात पोस्ट झालं तेव्हा रसिकांनी या ...

The fragrant aroma of Harmony and Symphony of Dasakkar sisters | दसककर भगिनींच्या हार्मनी अन‌् सिम्फनीचा अत्तरी सुगंध

दसककर भगिनींच्या हार्मनी अन‌् सिम्फनीचा अत्तरी सुगंध

Next

नाशिक : सोशल मीडियावर तीन वर्षांपूर्वी ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’ हे गाणं हार्मनी प्रकारात पोस्ट झालं तेव्हा रसिकांनी या मराठीतील या नावीन्यपूर्ण प्रकाराला भरभरून दाद दिली. जगभरात लाखो लोकांनी ते पाहिलं, हजारो लोकांनी ते शेअर केलं व भरभरून प्रतिक्रिया दिल्या. या हार्मनीच्या निर्मात्या होत्या नाशकातील दसककर भगिनी. भारतीय शास्त्रीय संगीतातील तराणा, सरगम, तबल्याचे बोल असे अनेक प्रकार वापरून त्यांनी केलेले गायन व वादन रसिकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे.

सौ. अश्विनी यांच्यासह कु. ईश्वरी, कु.गौरी, कु. सुरश्री तथा पूजा या भगिनी म्हणजे दसककर संगीत घराण्यातील चौथी पिढी. त्यांचे पणजोबा ह.भ.प. गोविंदशास्त्री दसककर हे राष्ट्रीय कीर्तनकार होते. आजोबा पं. प्रभाकर दसककर हे गायक, संगीतकार व हार्मोनियमवादक आहेत. वयाच्या ९४व्या वर्षीदेखील त्यांची संगीत साधना सुरू आहे. ईश्वरी व सुरश्रीचे वडील पं. सुभाष दसककर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हार्मोनियमवादक आहेत. आजोबा पं. प्रभाकर दसककर, पं. सुभाष दसककर तसेच काका माधव दसककर यांच्याकडे मुलींच्या सांगीतिक शिक्षणाला सुरुवात झाली. जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका पंडिता मंजिरी असनारे-केळकर यांच्याकडे त्यांनी गाण्याचे शिक्षण घेतले व जयपूर, किराणा व ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका पंडिता विदुषी अलका देव मारुलकर यांच्याकडे समग्र गायकीचे शिक्षण घेतले. सुभाष दसककर यांच्या देशविदेशातील सांगीतिक देवाणघेवाणीमुळे मुलींना पाश्चिमात्य संगीत ऐकण्याची, वाजवण्याची, अनुभवण्याची आवड निर्माण झाली. यातूनच बालपणापासून ते मुलींकडून हार्मनी म्हणवून घेत. घरातील आरती, ओमकार या सगळ्यांतून अगदी हसत खेळत व्होकल हार्मनी या प्रकाराचा आनंद घेण्यास मुलींनी सुरुवात केली. सुरुवातीला काही पाश्चिमात्य सिम्फनी बसविल्या. त्यातूनच त्यांना कल्पना सुचली आणि आपण या प्रकारात मराठी आणि हिंदी गाणी सादर केली तर किती वेगळे वाटेल, असा विचार पुढे आला. सुरुवातीला त्यांनी हा प्रयोग गाण्यातील शब्दांवर केला. नंतर त्यांनी गाण्यातील कडव्यांमधील वाद्यसंगीत आवाजाचे वेगवेगळे टोन वापरून सादर करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर तीन वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’ हे गाणं हार्मनी प्रकारात पोस्ट केलं आणि तेथून धमाका सुरू झाला. तसेच टर्कीश मार्च, फॉर एलिस यांसारख्या अनेक सिम्फनी भारतीय शास्त्रीय संगीतातील तराणा, सरगम, तबल्याचे बोल असे अनेक प्रकार वापरून केलेले गायन व वादन विशेष रसिकप्रिय झाले. संगीत क्षेत्रातील देशविदेशातील अनेक दिग्गज मान्यवर कलाकारांनी त्यांच्या या प्रयोगाचे कौतुक केले आहे. Dasakkar Sisters या त्यांच्या यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज व इन्स्टाग्राम पेजवर त्या नवनवीन प्रयोग सादर करत असतात. मुख्य म्हणजे मूळ गाण्याला धक्का न लावता त्यांच्या गाण्यावर प्रयोग करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आजवर त्यांनी असा बेभान हा वारा, पाहिले न मी तुला, ये राते ये मोसम नदीका किनारा, राजा सारंगा अशी अनेक गाणी हार्मनी व सिम्फनी प्रकारात सादर केली आहेत.

इन्फो

काय आहे हार्मनी प्रकार?

हार्मनी म्हणजे मुख्य स्वराला पूरक असलेले तीन ते चार माधुर्ययुक्त स्वर एकत्र गाणे, ज्याला आपण पाश्चिमात्य संगीतात कॉर्ड असे म्हणतो. याकरिता स्वरज्ञानाबरोबरच सूक्ष्म स्वरज्ञानदेखील आवश्यक असते. बाकीच्यांचे वेगवेगळे स्वर ऐकू येत असतानाही आपल्या स्वराला चिटकून राहून आपली भूमिका पूर्णपणे निभावणे ही खूप आश्चर्यकारक व अवघड गोष्ट आहे, जी दसककर भगिनींच्या सादरीकरणातून दिसते.

इन्फो

एकमेकांशी चांगलं ट्युनिंग

दसककर भगिनी म्हणतात, आमच्या स्वरांप्रमाणे आमची मनंपण एकमेकांशी जुळली गेली आहेत. सांगीतिक भाषेत सांगायचे झाल्यास आमचं एकमेकांशी चांगलं ट्युनिंग आहे. हीच एकरूपता आमच्या गायनात उतरते व लोकांपर्यंत पोहोचते असं आम्हाला वाटतं. कोणतीही नवीन रचना करतानादेखील एकामिळती एक व पूरक असं आम्हाला सुचत जातं व त्याची मजा आम्हाला येते आणि त्यातूनच नवनिर्मिती होते. आजोबांनी चालबद्ध केलेला संपूर्ण हरिपाठाचा अभंगांचा कार्यक्रम आम्हाला सादर करताना खूप आनंद होतो. आम्ही अजूनही शिकत आहोत व असे नवनवीन प्रयोग करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

फोटो- १६दसककर भगिनी

160721\465916nsk_33_16072021_13.jpg

फोटो- १६दसककर भगिनी 

Web Title: The fragrant aroma of Harmony and Symphony of Dasakkar sisters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.