नागमणीचे आमिष दाखवून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 04:23 PM2018-08-21T16:23:55+5:302018-08-21T16:24:10+5:30

नांदगांव: खोटा नागमणी चमत्कारिक असल्याचा आव आणून त्यातून आर्थिक भरभराटीचे आमिष दाखविणाऱ्या अस्वलदº्यातील सहा संशियत फासे पारध्यांना नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शिंगनाळे येथील धनाजी तुळशीराम इपरकर यांनी सदर इसमांनी आपली १ लाख ६३ हजार रु . ना फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे.

 Fraud by showing the bait of cottage | नागमणीचे आमिष दाखवून फसवणूक

नागमणीचे आमिष दाखवून फसवणूक

Next
ठळक मुद्दे नागमण्यामुळे पैसा अडका येतो भरभराट होते. अशी बतावणी करण्यात आली. त्यामुळे प्रभावित झालेल्या इपरकरांनी नागमणी विकत घेण्याची तयारी दाखवली आधी पाच लाख रु पये किंमत सांगितलेला तथाकथित नागमणी तडजोडीने १ लाख ६३ हजार रु पयांना विकण्यात आला.

 


नांदगांव: खोटा नागमणी चमत्कारिक असल्याचा आव आणून त्यातून आर्थिक भरभराटीचे आमिष दाखविणाऱ्या अस्वलदº्यातील सहा संशियत फासे पारध्यांना नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शिंगनाळे येथील धनाजी तुळशीराम इपरकर यांनी सदर इसमांनी आपली १ लाख ६३ हजार रु . ना फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे.

धनाजी इपरकर यांचे कुरणेवस्तीवर छोटेखानी हॉटेल आहे त्यांच्या गावाजवळ अथनीरोडला यल्लम्मा देवीचे मंदिर आहे देवीच्या यात्रेच्या निमित्ताने सातारा येथील राजू डोबे यांच्याशी इपरकर यांची मैत्री झाली. डोबे याच्याबरोबर इपरकर नांदगाव येथे आले. तिथून अस्वलदरा येथे एका अंधाºया खोलीत चमकणारा नागमणी दाखिवण्यात आला. नागमण्यामुळे पैसा अडका येतो भरभराट होते. अशी बतावणी करण्यात आली. त्यामुळे प्रभावित झालेल्या इपरकरांनी नागमणी विकत घेण्याची तयारी दाखवली आधी पाच लाख रु पये किंमत सांगितलेला तथाकथित नागमणी तडजोडीने १ लाख ६३ हजार रु पयांना विकण्यात आला.
या व्यवहारात धनाजी यांना नांदगाव येथे प्रथमच भेटलेल्या दाढीवाल्या इसमाचा रोल असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. सातारा येथील राजूचा नांदगाव मधील फासेपार्ध्यांशी असलेला संबंध नेमका काय? अशा प्रश्नांची उकल करण्यात नांदगाव पोलीस गुंतले आहेत. दम्यान या प्रकरणातले गूढ असलेला नागमणी एका अंड्यासारख्या डबीत कापसामध्ये घालून धनाजी यांना दाखिवण्यात आला होता. तसेच डबी घरी गेल्यावर देवपूजा करून उघड अन्यथा मण्याची पॉवर कमी होईल असे सांगून हा नागमणी विकला मात्र घरी गेल्यावर नागमणी काही केल्या प्रकाशित होईना तेव्हा आपण फसविले गेलो हे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या तक्र ारीवरून नांदगाव पोलिसांनी अस्वलदरा येथील सदर दाढीवाला इसमसह अन्य पाच संशियतांना ताब्यात घेतले आहे. अंधाºया खोलीत सदर नागमणी कसा चमकला? याचे गूढ पोलीस तपासात उकलावे. पोलीस हवालदार रमेश पवार पुढील तपास करीत आहेत

फोटो पोलीसांनी हस्तगत केलेला हाच तो बनावट नागमणी जो प्रकाशीत झालाच नाही...(21नांदगाव नागमणी)

 

Web Title:  Fraud by showing the bait of cottage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.