फसव्या आकडेवारीमुळेच शहरात पाणीकपातीची वेळ

By admin | Published: March 14, 2016 11:43 PM2016-03-14T23:43:47+5:302016-03-15T00:10:41+5:30

देवांग जानी यांचा आरोप : जलसंपदा विभागाचा गोंधळ

Fraudulent figures are due to water-time in the city | फसव्या आकडेवारीमुळेच शहरात पाणीकपातीची वेळ

फसव्या आकडेवारीमुळेच शहरात पाणीकपातीची वेळ

Next

नाशिक : जलसंपदा विभागाच्या २०१२च्या अधिकृत आकडेवारीनुसार मार्च २०१२ मध्ये ३६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता. आता मार्च २०१६ मध्ये जलसंपदा विभागाच्या नवीन आकडेवारीनुसार गंगापूर धरणात ५४ दलघमी पाणीसाठा असल्याचे दर्शविण्यात आले आहे. म्हणजेच २०१२च्या तुलनेत धरणात १८ दलघमी पाणीसाठा जास्तीचा आहे. असे असेल तर मग पाणीकपातीची वेळ का आली? असा प्रश्न उपस्थित करीत गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी जलसंपदा विभाग पाणीसाठ्याची फसवी आकडेवारी जाहीर करीत नाशिककरांची फसवणूक करीत असल्याचा आरोप केला आहे.
गंगापूर धरणातील पाणीसाठ्याची क्षमता जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार १५९.४२ मिलीयन क्युबिक मीटर (दलघमी) आहे. २००२ मध्ये मेरी संस्थेने गंगापूर धरणाच्या गाळासंदर्भात सर्वेक्षण केले होेते. त्यानुसार गंगापूर धरण १९५४ ला बांधले गेले. त्यावेळी धरणाची साठवणूक क्षमता ४३.७५ मिलीयन क्युबिक मीटर (दलघमी) जमा झाल्या कारणाने २७ टक्केने कमी झाली आहे. तसेच २००३ ते २०१६ या कालावधीत जमा झालेला अतिरिक्त गाळाचा विचार करता ही क्षमता आणखी कमी झाल्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाच्या ४ मार्च २०१६च्या आकडेवारीनुसार गंगापूर धरणात एकूण क्षमता १५९ दलघमी पैकी उपयुक्त पाणीसाठा ५४ दलघमी (क्षमतेच्या ३४ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात १९५४च्या धरणाची जलसाठवणूक क्षमता मोजली गेलेली आहे. मेरी या सरकारी संस्थेने २००२च्या केलेल्या सर्वेक्षणानुसार गाळ वजा करून पाणीसाठ्याची आकडेवारी मांडली गेली पाहिजे होती, परंतु सध्याची पाणीसाठ्याची आकडेवारी ही फुगली गेलेली आहे. राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार दोन कोटी भाविक पर्वणीच्या काळात येऊन गेले. साधुग्राममध्ये आखाड्यातील महतांचा चार महिन्यांचा पाणीपुरवठा करण्यात आला तो वेगळा. त्यामुळेच गंगापूर धरणात गाळ किती आणि त्याची साठवण क्षमता किती? आजमितीस धरणात नेमका किती पाणीसाठा आहे? याची वस्तुनिष्ठ माहिती नाशिककरांना मिळायला हवी. जलसंपदा विभाग फसवी आकडेवारी देत असल्याचा आरोप गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष व राष्ट्रवादी शहर कॉँग्रेसचे पंचवटी विभाग अध्यक्ष देवांग जानी यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fraudulent figures are due to water-time in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.