शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
3
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
4
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
5
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
6
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
7
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
8
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
9
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
10
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
11
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
12
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
13
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
14
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
15
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
16
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
17
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
18
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
19
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
20
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात

फसव्या आकडेवारीमुळेच शहरात पाणीकपातीची वेळ

By admin | Published: March 14, 2016 11:43 PM

देवांग जानी यांचा आरोप : जलसंपदा विभागाचा गोंधळ

नाशिक : जलसंपदा विभागाच्या २०१२च्या अधिकृत आकडेवारीनुसार मार्च २०१२ मध्ये ३६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता. आता मार्च २०१६ मध्ये जलसंपदा विभागाच्या नवीन आकडेवारीनुसार गंगापूर धरणात ५४ दलघमी पाणीसाठा असल्याचे दर्शविण्यात आले आहे. म्हणजेच २०१२च्या तुलनेत धरणात १८ दलघमी पाणीसाठा जास्तीचा आहे. असे असेल तर मग पाणीकपातीची वेळ का आली? असा प्रश्न उपस्थित करीत गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी जलसंपदा विभाग पाणीसाठ्याची फसवी आकडेवारी जाहीर करीत नाशिककरांची फसवणूक करीत असल्याचा आरोप केला आहे.गंगापूर धरणातील पाणीसाठ्याची क्षमता जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार १५९.४२ मिलीयन क्युबिक मीटर (दलघमी) आहे. २००२ मध्ये मेरी संस्थेने गंगापूर धरणाच्या गाळासंदर्भात सर्वेक्षण केले होेते. त्यानुसार गंगापूर धरण १९५४ ला बांधले गेले. त्यावेळी धरणाची साठवणूक क्षमता ४३.७५ मिलीयन क्युबिक मीटर (दलघमी) जमा झाल्या कारणाने २७ टक्केने कमी झाली आहे. तसेच २००३ ते २०१६ या कालावधीत जमा झालेला अतिरिक्त गाळाचा विचार करता ही क्षमता आणखी कमी झाल्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाच्या ४ मार्च २०१६च्या आकडेवारीनुसार गंगापूर धरणात एकूण क्षमता १५९ दलघमी पैकी उपयुक्त पाणीसाठा ५४ दलघमी (क्षमतेच्या ३४ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात १९५४च्या धरणाची जलसाठवणूक क्षमता मोजली गेलेली आहे. मेरी या सरकारी संस्थेने २००२च्या केलेल्या सर्वेक्षणानुसार गाळ वजा करून पाणीसाठ्याची आकडेवारी मांडली गेली पाहिजे होती, परंतु सध्याची पाणीसाठ्याची आकडेवारी ही फुगली गेलेली आहे. राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार दोन कोटी भाविक पर्वणीच्या काळात येऊन गेले. साधुग्राममध्ये आखाड्यातील महतांचा चार महिन्यांचा पाणीपुरवठा करण्यात आला तो वेगळा. त्यामुळेच गंगापूर धरणात गाळ किती आणि त्याची साठवण क्षमता किती? आजमितीस धरणात नेमका किती पाणीसाठा आहे? याची वस्तुनिष्ठ माहिती नाशिककरांना मिळायला हवी. जलसंपदा विभाग फसवी आकडेवारी देत असल्याचा आरोप गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष व राष्ट्रवादी शहर कॉँग्रेसचे पंचवटी विभाग अध्यक्ष देवांग जानी यांनी केला आहे. (प्रतिनिधी)