वटार : येथील वस्तीत बिबट्याचा मुक्तसंचार असून काल रात्री बाजीराव भिला बागुल यांच्या गायीच्या गोठ्यावर रात्री बिबट्याने हल्ला चढवित गो-हा फस्त केला. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. दरवर्षी या परिसरात बिबट्याचा वावर असतो. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुधाची जनावरेही मोठ्या प्रमाणात आहेत. परिसरात बिबट्याचा बऱ्याच दिवसापासून वावर असून दोन तीन शेतकऱ्यांना मुक्त दर्शनही घडत आहे. दरवर्षी भक्षाच्या शोधात येथे बिबट्या येतो व पाळीव प्राण्यांवर ताव मारतो. येथे लपण्यासाठी मोठी काटेरी झुडपे आहेत.येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुग्ध व्यवसायही शेतीला जोडधंदा म्हणून करतो. परिसरात बिबट्याच्या वावर असल्यामुळे रात्र ही जागुण काढावी लागत आहे, मेंढपाळ फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे संरक्षण करत आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यात १५ पाळीव प्राण्यांना आपला जिव गमवावा लागला असून गुरूवारी मध्यरात्री अचानक भक्षाच्या शोधात गाईच्या गोठ्यावर हल्ला चढवत गाईचे चार ते पाच महिन्याचे वासरू फस्त केले.सरद घटनेची माहिती वनविभागाला कळविले असता तात्काळ गोरख पवार वनपाल यांनी घटनेची दखल घेत घटनास्थळी येऊन ांचनामा केला. यावळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. उपाययोजना म्हणून वनविभागाने लक्ष घालवे व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरतील शेतकºयांनी केले आहे.यावेळी पोलीस पाटील किरण खैरनार, वनपाल गोरख पवार, हेमंत खैरनार, अशोक बागुल, निंबा गांगुर्डे, गणेश बागुल, बाजीराव बागुल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
वटार परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 4:10 PM
वटार : येथील वस्तीत बिबट्याचा मुक्तसंचार असून काल रात्री बाजीराव भिला बागुल यांच्या गायीच्या गोठ्यावर रात्री बिबट्याने हल्ला चढवित गो-हा फस्त केला.
ठळक मुद्दे ग्रामस्थ भयभीत : पशुधन धोक्यात