आदेशाविनाच मजुरांना मोकळीक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:43 PM2020-05-10T22:43:46+5:302020-05-10T22:51:07+5:30
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पायी, वाहनांनी मूळ गावाकडे परतणाऱ्या मजुरांना जिल्ह्याच्या सीमेवर रोखून त्यांची रवानगी निवाराशेडमध्ये करण्याचे काम थांबविण्यात आले असून, दररोज हजारोंच्या संख्येने नाशिककडे येणाºया मजुरांना प्रशासनाने मोकळीक दिल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

कोरोनाचा देशव्यापी वाढता प्रसार लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने जनतेला आहे तेथेच राहण्याचे आवाहन केले होते, त्याचबरोबर गावोगाव, जिल्ह्याच्या सीमा बंद करून तेथे पोलीस, महसूल यंत्रणेला तैनात करण्यात आले होते, दिवसरात्र अशा सीमांवर पळत ठेवून चोरी-छुप्यामार्गाने घुसखोरी वा सीमा ओलांडून जाऊ पाहणाऱ्यांना पकडून व प्रसंगी लॉकडाउन तोडल्याबद्दल पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले होते, अशा पकडलेल्या लोकांना निवाराशेडमध्ये ठेवण्यात येते.
नाशिक जिल्ह्यात धुळे, औरंगाबाद, नगर, नंदुरबार, पालघर, ठाणे या जिल्ह्यांबरोबरच शेजारील गुजरात राज्यातून मजूर येऊ नये याची काळजी घेतली जाऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे प्रयत्न आजवर सुरू होते, परंतु लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाल्यानंतर शासनाचे कोणतेही आदेश नसताना, पायी गावाकडे परतणाºया स्थानिक नागरिक तसेच परप्रांतीय मजुरांच्या स्थळांकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हजारो मजूर पायीच गावाकडे निघाले असून, त्यांची विचारपूस वा वैद्यकीय तपासणीकडे काणाडोळा करण्यात आला आहे, या संदर्भात काही अधिकाºयांना विचारले असता, त्यांनी अनभिज्ञता दर्शविली, मात्र त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.