नाशिक : मैत्री स्वच्छ, निखळ अन् निकोप असली तर ती वेळेप्रसंगी रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक श्रेष्ठ ठरते. मैत्रीचे बंध दृढ जरी असले तरी हे नाते कुठल्याहीप्रकारचा गुन्हा कदापी मान्य करत नाही. निकोप मैत्रीचे ऋुणानुबंध हे कधीही कलंकित होऊ शकत नाही; मात्र या मैत्रीच्या बंधात अडकलेल्या एका अल्पवयीन मुलीने आपल्या मित्राची बाइक, मोबाइलची गरज पूर्ण करण्यासाठी चक्क तिच्या नातेवाईकांच्या घरातील दागिणे आणि रोकडवरच डल्ला मारत सुमारे साडेसहा लाखांचा ऐवज लुटल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे.याबाबत मुंबईनाका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका १५ वर्षीय मुलीने तिच्याच नातेवाईकांच्या घरातील दागिने चोरी करु न आपल्या मित्राला दिले. हा प्रकार जेव्हा नातेवाईकांच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी पोलीस ठाणे गाठून चोरीची फिर्याद दिली. मुंबईनाका पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे गतिमान करत संशयित मुलीच्या मित्राला अटक केली. ेजनरल वैद्यनगर येथे नागपाल कुटूबिंयांच्या घरी वाढिदवस असल्याने त्यांनी नातेवाईकांना बोलवले होते. त्यात अल्पवयीन मुलगी तिच्या आजीसह हजर झाली व रात्री नातेवाईकांच्याच घरी झोपली. त्यावेळी तिने त्यांच्या घरातून ६ लाख ४० हजार ८२० रु पयांचे सोन्याचे दागिने व काही रोकड लंपास केली. दरम्यान, चोरीची बाब लक्षात येताच नागपाल यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तपास सुरु करत प्रथम अल्पवयीन मुलीची चौकशी केली. नातेवाईकांनी विश्वासात घेतल्यानंतर तिने चोरीची कबुली दिली. तीचा मित्र दीप धनजंय भालेराव (२०, रा. पंचवटी कारंजा) यास मोबाइल व दुचाकी घ्यावयची असल्याने त्यास पैशांची मदत करण्यासाठी चोरी केल्याची कबुली त्या मैत्रिणीने दिली. मुलीने चोरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच जनरल वैद्यनगर येथे बोलवून घेत चोरीचे दागिने व पैसे दिले होते. त्यानंतर ती तिच्या आजीसह घरी गेली होती. पोलिसांनी दीपलादेखील अटक केली असून त्याच्या घरातून ६ लाख ४० हजार ८२० रु पयांचे दागिने व रोकड जप्त केली आहे. अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास मुंबईनाका पोलीस करत आहेत.