अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आयुक्त कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:28 AM2019-06-04T00:28:17+5:302019-06-04T00:28:51+5:30
महाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
नाशिकरोड : महाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी दुपारी बृजपाल सिंह, भगवान दवणे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयावर घोषणाबाजी करत मोर्चा काढला होता. उपायुक्त रघुनाथ गावडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इतर राज्याच्या तुलनेने महाराष्टÑातील अंगणवाडी सेवक, मदतनीस यांना अत्यल्प मानधन आहे. मानधन वाढीची रक्कम फरकासह देण्यात यावी. अंगणवाडी सेवक, मदतनीस यांच्या जागा भराव्यात़ सुट्टीचे फायदे देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. मोर्चामध्ये कमल गायकवाड, संगीता कासार, लता क्षीरसागर, कुमुदिनी देवरे, अंजना वाघ, राजश्री पानसरे, लीलामती पगारे, आशाबाई देव्हडे, राजश्री पानसरे, आदी सहभागी झाल्या होत्या.
अंगणवाडी कर्मचाºयांना सेवानिवृत्त झाल्यानंतर मानधनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्यात यावी, ३० एप्रिल २०१४ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाºयांना एकरकमी १ लाख रुपये देण्यात यावे, विविध योजनांच्या कामासाठी टी.ए.डी.ए.ची थकीत रक्कम देण्यात यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़