नाशिक : महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठात गेल्या १० ते १२ वर्षांपासून स्थायी स्वरूपाचे काम करणाºया सुमारे ३०० कर्मचाºयांनी किमान वेतन मिळावे आणि कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन पुकारले असून, या कामगारांच्या मागण्यांकडे विद्यापीठाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाºयांनी गुरुवारी पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या नाशिकमधील कार्यालयावर मोर्चा काढला. आरोग्य विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाºयांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाला कामगार उपायुक्ततसेच कामगार न्यायालयात पुरेसे उत्तर देता आले नसताना आणि कंत्राटी कर्मचारी विद्यापीठाचेच असल्याचे मान्य करूनही विद्यापीठाने अद्यापही कंत्राटी कर्मचाºयांना न्याय दिलेला नसल्याने आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. गेल्या ५ डिसेंबर २०१७ पासून कंत्राटी कर्मचारी समान काम, समान दाम, याप्रमुख मागणीसह निलंबित कर्मचाºयांना कामावर रुजू करून घ्यावे, कंत्राटी कर्मचाºयांना विद्यापीठ सेवेत सामावून घ्यावे, अशा सात मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. गोल्फ क्लबवरून काढण्यात आलेल्या या मोर्चात डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, तानाजी जायभावे, अॅड. श्रीधर देशपांडे आदी नेत्यांसह कंत्राटी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
कंत्राटी कर्मचाºयांचा मोर्चा आरोग्य विद्यापीठ : आंदोलनाचा ६३वा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 1:38 AM
नाशिक : महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठात गेल्या १० ते १२ वर्षांपासून स्थायी स्वरूपाचे काम करणाºया सुमारे ३०० कर्मचाºयांनी किमान वेतन मिळावे आणि कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन पुकारले .
ठळक मुद्देन्याय दिलेला नसल्याने आंदोलन विद्यापीठ सेवेत सामावून घ्यावे