कसभा निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले, कारण इ.स. २०१४ नंतर मोदी सरकारने जनतेला विशेषत: महिलावर्गाला जी आश्वासने दिली होती त्याची नोंद सर्वांनी घेतली. विशेषत: महिलांनी घेतली होती. त्या आश्वासनांची काही प्रमाणात पूर्तता झाल्याने त्यांनी आपले मत पुन्हा एकदा मोदी सरकारला दिले आहे. निवडणुकीच्या निकालापूर्वी सर्वच राजकीय पक्षांमध्ये ज्या पद्धतीने प्रचार सुरू होता, त्यामुळे नक्की कोण निवडून येणार याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. इ.स. २०१४ मध्ये जनतेला देशात सत्ता बदल हवा त्यामुळे तेव्हा मोदी लाट होती. त्यापेक्षाही आताची लाट जबरदस्त आहे, असे दिसून येते. याची कारणे म्हणजे गेल्या पाच वर्षांत शहरी, ग्रामीण भागातील स्त्रिया तसेच उद्योजक महिला अशिक्षित आणि सुशिक्षित गृहिणी अशा सर्वच क्षेत्रातील महिलांच्या अपेक्षा बऱ्याच अंशी साकारल्या आहेत. मोदींच्या सरकारच्या काळात महिलांचे शिक्षण, महिलांसाठी उद्योग व्यवसाय, महिला आरोग्यासाठीच्या विशेष योजना आणण्यात आल्या. गर्भवती महिलांना योग्य आहार पुरविणे, त्यांच्यावर औषधोपचार करणे व त्यांची प्रसूती सुरक्षित व्हावी म्हणून सरकारी यंत्रणेने काळजी घेतली. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सर्वांसाठी स्वच्छतागृह, खेड्यापाड्यामध्ये सोयी-सुविधा केल्या आहेत. उज्ज्वला गॅस योजनेमुळे अनेक घरांमध्ये चुली ऐवजी घरगुती गॅस सिलिंडर आला आहे. त्याचप्रमाणे बॅँक बचत खाते योजनामुळे महिलांना बॅँकेत खाते उघडण्यात आले. बॅँकेमार्फत मेडिक्लेमच्या सुविधा मिळाल्या. जीएसटीमुळे अनेक कर एकत्र झाले आहेत. त्यात सुटसुटीतपणा आला आहे. आॅनलाइन व्यवहारामुळे दैनंदिन आर्थिक व्यवहार सोपे झाले आहेत.निवेदिता पवार
महिलांसाठीच्या विविध योजनांची पूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:42 AM