नाशिकसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांना निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 09:47 PM2021-04-28T21:47:07+5:302021-04-29T00:38:49+5:30
त्र्यंबकेश्वर : गेल्या २० ते २५ वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंजनेरी-मुळेगाव-जातेगाव ते गौळाणे -विल्होळी हा प्रमुख जिल्हा मार्ग तसेच वाडीवऱ्हे-दहेगाव-जातेगाव-महिरावणी ते गिरणारे-वाघेरा हा राज्य महामार्ग यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

अंजनेरी-मुळेगाव-जातेगाव ते गौळाणे-विल्होळी ह्या प्रमुख जिल्हा मार्गासाठी चार कोटी ८७ लाख ९३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
त्यानुसार या रस्त्याचे लवकरच नूतनीकरण होणार आहे. तसेच वाडीवऱ्हे, दहेगाव, जातेगाव, महिरावणी ते गिरणारे, वाघेरा हा राज्य महामार्गही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. याही रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी या निधीला मंजुरी दिली आहे. या भागातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल नाशिकसह इतर बाजारपेठांमध्ये वाहतूक करणेकामी सुलभ व्हावे तसेच अंजनेरीच्या गडावर येणाऱ्या भाविकांना थेट गडावर येणे सोपे व्हावे यासाठी खासदार गोडसे यांनी अंजेनरी-मुळेगाव रस्त्यासाठी केंद्राकडे मागणी केली होती. गडकरी यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील चार विशेष रस्ता कामांसाठी तब्बल १४ कोटी १३ लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमाल इतरत्र वाहतूक करण्यासाठी जलद रस्ते उपलब्ध होणार असून, तसेच या रस्त्याच्या नूतनीकरणामुळे पर्यटन विकासाला अधिकाधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे.