जनसेवा प्रतिष्ठानच्या पुढाकारानेबेवारस मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 09:34 PM2021-04-07T21:34:20+5:302021-04-08T00:55:49+5:30
घोटी : जनसेवा थांबली नाही आणि थांबणारही नाही हे घोषवाक्य अंगीकारत इगतपुरी येथील जनसेवा प्रतिष्ठानने गेल्या वर्षीभरात राबविलेले अन्नदानछत्राचे काम आजही अविरतपणे सुरु ठेवले, गरजू रुग्णांना ऑक्सिजन, सामान्य जनतेला मदत, गरजू रुग्णांसाठी रक्तदान अशा अनेक कामातून जनसेवा प्रतिष्ठानने मंगळवारी (दि.६) इगतपुरीत बेवारस शीख बांधव मृत झाल्याने त्याच्या अंत्यसंस्काराचे सोपस्कर पार पाडले.

याबाबतचा प्रसंग असा की शुक्रवारी (दि.२) सायंकाळी इगतपुरी शहरातील श्री शिवाजी चौक येथे एक बेवारस शिख बांधव मृत अवस्थेत आढळून आला. या अगोदर हा शीख बांधव शहापूर, इगतपुरी येथे काही वर्षांपूर्वी गुरुद्वारात सेवा करायचा. परंतु ७/८ महिन्यांपासून इगतपुरी शहरात निराधार असल्याने वावरत होता. या बेवारस व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या प्रश्न पोलीस प्रशासनापुढे उभा ठाकला.
येथील जनसेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना हे समजताच त्यांनी इगतपुरीत अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी घेतली. शनिवारी (दि.३) दुपारी सदर व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे किरण फलटणकर, विशाल चांदे, सागर परदेशी, त्रिलोकसिंग गर्चा व शहापूर, बोरटेंभा इगतपुरी येथील गुरुद्वारा येथील बाबाजी उपस्थित होते.