डिस्टन्सिंगच्या नियमाचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:35 AM2021-01-13T04:35:00+5:302021-01-13T04:35:00+5:30
गोदावरीत मिसळतेय दूषित पाणी नाशिक : शहरातील विविध भागांमधून गोदावरी नदीपात्रात गटारीचे पाणी सोडले जात असल्याने गाेदावरीच्या प्रदूषणात वाढ ...
गोदावरीत मिसळतेय दूषित पाणी
नाशिक : शहरातील विविध भागांमधून गोदावरी नदीपात्रात गटारीचे पाणी सोडले जात असल्याने गाेदावरीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष हाेत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या भाजीपाला विक्री केंद्रांना प्रतिसाद
नाशिक : शहरातील विविध भागांमध्ये शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून थेट ग्राहकांना भाजीपाला विक्री केली जात आहे. या केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांना रास्त दरात ताजा भाजीपाला मिळत असल्याने अनेक नागरिक या भाजीपाला विक्री केंद्रांवर जाऊन भाजी खरेदी करतात. यामुळे अनेक शेतकरी तरुणांना रोजगार प्राप्त झाला आहे.
होळकर पुलावर कचरा
नाशिक : होळकर पुलावर अनेक नागरिक निर्माल्य टाकत असल्याने या परिसराला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मोकाट जनावरे हा कचरा अस्ताव्यस्त पसरवितात. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. येथे स्वच्छता करून निर्माल्य टाकण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
काजीपुऱ्यातील रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
नाशिक : जुन्या नाशिकमधील काजीपुरा भागात महापालिकेतर्फे उभारण्यात आलेले रुग्णालय गेल्या अनेक दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. आजी, माजी नगरसेवकांच्या श्रेयवादामुळे हे रुग्णालय अद्याप सुरू झाले नसल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे. याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
धोका पत्करून भाजी विक्रीचा व्यवसाय
नाशिक : शहरातील रविवार कारंजा येथील यशवंत मंडई धोकादायक झाल्याने येथील सर्व गाळे रिकामे करण्यात आले आहेत. मात्र, अनेक भाजी विक्रेते धोका पत्करून या गाळ्यांच्या समोर बसून भाजी विक्रीचा व्यवसाय करत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत महापालिकेने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
वाहतूक बेटांची दुरवस्था
नाशिक : शहरातील काही भागातील वाहतूक बेटांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पालापाचोळा साचला असून, वाहतूक बेटांना बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, बेटांची स्वच्छता करण्याची मागणी करण्यात येत आहे.
अवजड वाहनांची वर्दळ वाढली
नाशिक : अगर टाकळी परिसरातून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे छोट्या वळणावर अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे. मोठ्या वाहनांना वळण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याचे दिसून येत आहे. या भागात अेनकवेळा लहान मुले रस्त्यावर खेळत असतात. यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत उपाययोजना करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.