मालेगावी तहसील कचेरीत आसिफ शेख यांची गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 11:56 PM2021-11-08T23:56:28+5:302021-11-08T23:57:13+5:30
मालेगाव : येथील तहसीलदारांसह विविध शासकीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांना आठ ऑक्टोबरपूर्वी मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असे पत्र दिले होते. मुदतीपूर्वी कामे पूर्ण न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार यांनी सोमवारी (दि. ८) तहसील कचेरीत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. यावेळी त्यांची तहसीलदार चंद्रजित राजपूत यांचेशी शाब्दिक खडाजंगी झाली. त्यानंतर त्यांनी सामान्य रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधीक्षक हितेश महाले यांनाही गुलाबपुष्प देऊन आंदोलन केले.

गेल्या महिन्यात २६ ऑक्टोबर रोजी माजी आमदार शेख यांनी तहसीलदार, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांना निवेदने देऊन मागण्या मान्य न झाल्यास आठ ऑक्टोबरला आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी आज तहसील कचेरीत तहसीलदारांच्या नावाच्या पाटीसमोर गुलाबपुष्प लावत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. सरकारी ऑडिटमध्ये तहसीलदारांवर आक्षेप घेण्यात आल्याचे आसिफ शेख यांनी सांगून कोट्यवधी रुपयांचे सरकारी नुकसान केल्याचा आरोप केला. आधार कार्डाच्या नावावर पैसे घेतले जात असून एजंटगिरी बंद करावी अशी मागणी त्यांनी केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तहसीलदार जबाबदार राहतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार म्हणाले, दिवाळीपूर्वी बैठक घेण्याबाबत आसिफ शेख यांनी सांगितले होते; परंतु मध्ये दिवाळी आल्याने बैठकीस उशीर झाला.
सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हितेश महाले यांनाही शेख यांनी गुलाबाचे फूल देऊन आंदोलन केले. सामान्य रुग्णालयातून रुग्ण धुळे येथे हलवू नये. सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णास तेथेच उपचार मिळावेत अशी मागणी त्यांनी केले.
पत्रानंतर आंदोलन मागे
आंदोलनानंतर तातडीने तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी संजय गांधी निराधार योजनेची शहरासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक येत्या शुक्रवारी दि. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता संजय गांधी योजना शहर दालनात घेण्यात येत असल्याचे पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.