मालेगाव : महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ प्रभाग ११च्या नगरसेवकांनी हातात फावडे घेऊन स्वखर्चाने खडी-मुरूम टाकून रस्त्यांवरील खड्डे बुजवून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.प्रभाग क्र. ११चे नगरसेवक मदन गायकवाड, भारत बागुल, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शेलार आदींनी सटाणा नाक्यासह प्रभागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्याची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र याची दखल घेतली गेली नसल्याने गायकवाड, बागुल, शेलार यांनी स्वखर्चाने मुरुम टाकून रस्त्यांवरील खड्डे बुजविले. मालेगाव महापालिका प्रशासन व पाणीपुरवठा विभागाच्या देखभाल कंत्राटदार यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. याचा परिणाम कामांवर झाला आहे. ठिकठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाण्याचे डबके साचत आहेत. याबाबत नागरिकांकडून मनपाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. नगरसेवकांनीही मनपा प्रशासनाला याबाबत कळवूनदेखील दाद दिली गेली नाही. नगरसेवकच मनपा प्रशासनापुढे हतबल झाले आहेत. कोणताचा पर्याय दिसत नसल्याने प्रभाग ११ मधील कलेक्टरपट्टा, नवी वस्ती, बोरसे नगर, अयोध्यानगर, स्वप्नपूर्तीनगर नगरसेवकांनी स्वखर्चाने मुरूम टाकून खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे.
खड्डे बुजवून नगरसेवकांची गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:56 PM
महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ प्रभाग ११च्या नगरसेवकांनी हातात फावडे घेऊन स्वखर्चाने खडी-मुरूम टाकून रस्त्यांवरील खड्डे बुजवून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.
ठळक मुद्देमालेगाव : मनपाकडून तक्रारींना दाखविली जाते केराची टोपली