लासलगाव : शेतकऱ्यांचे बैल, इलेक्ट्रिक मोटार, जलपरी चोरी करणारी टोळी लासलगाव पोलिसांच्या जाळ्यात आली आहे. याप्रकरणी आकाश सोपान मापारी, कारभारी काशिनाथ हिरे, चेतन आंबादास गांगुर्डे, भास्कर भाऊराव बर्डे सर्व रा. दिधवद, ता. चांदवड, सागर ज्ञानेश्वर केदारे, रा. तळेगाव रोही, ता. चांदवड यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. संशयितांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी निफाड यांचे न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी दिली. संशयितांकडून विनायक मुरलीधर शेजवळ यांची चोरी गेलेली पाणबुडी हस्तगत करण्यात आली आहे. मनोज पवार, मूळ रा. दावसवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर, ह.मु. चांदवड यांचादेखील शोध घेतला असता तो अद्याप फरार आहे. दरम्यान, रखमा नंदुराम सुपेकर, रा. कोटमगाव, ता. निफाड यांच्या शेतातून रोडकडेस बांधलेले दोन खिल्लारी बैल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी लासलगाव पोलिसात दाखल केली होती. विनायक मुरलीधर शेजवळ, रा. लासलगाव राजवाडा यांची पाणबुडी मोटार ब्राह्मणगाव शिवारातील विहिरीतून चोरी झाल्याने त्यांनीही फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, सहा. पोलीस उपनिरीक्षक देवीदास विश्वनाथ लाड, कैलास दत्तात्रय महाजन आदी करत आहेत.
बैल, जलपरी चोरी करणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 12:35 AM
शेतकऱ्यांचे बैल, इलेक्ट्रिक मोटार, जलपरी चोरी करणारी टोळी लासलगाव पोलिसांच्या जाळ्यात आली आहे. याप्रकरणी आकाश सोपान मापारी, कारभारी काशिनाथ हिरे, चेतन आंबादास गांगुर्डे, भास्कर भाऊराव बर्डे सर्व रा. दिधवद, ता. चांदवड, सागर ज्ञानेश्वर केदारे, रा. तळेगाव रोही, ता. चांदवड यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली.
ठळक मुद्देशिताफीने अटक : लासलगाव पोलिसांची कामगिरी