गंगापूर धरण परिसर ‘प्रतिबंधित क्षेत्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:21 AM2018-08-21T01:21:03+5:302018-08-21T01:21:22+5:30

गंगापूर धरण परिसराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सावरगाव बॅकवॉटरला होणारी पर्यटकांसह मद्यपींच्या टोळक्यांची गर्दी, घडणाऱ्या दुर्घटना आणि हुल्लडबाजी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी गस्त वाढविली आहे.

 Gangapur Dam Campus 'Restricted Area' | गंगापूर धरण परिसर ‘प्रतिबंधित क्षेत्र’

गंगापूर धरण परिसर ‘प्रतिबंधित क्षेत्र’

Next

नाशिक : गंगापूर धरण परिसराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सावरगाव बॅकवॉटरला होणारी पर्यटकांसह मद्यपींच्या टोळक्यांची गर्दी, घडणाऱ्या दुर्घटना आणि हुल्लडबाजी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी गस्त वाढविली आहे. तसेच ठिकठिकाणी पोलीस व पाटबंधारे विभागाच्या वतीने सूचना फलक लावण्यात आले असून, प्रतिबंधित क्षेत्र म्हणून धरण परिसर घोषित करण्यात आला आहे. गंगापूरचा जलसाठा ९१ टक्क्यांवर पोहचला असून छायाचित्र, सेल्फी टिपण्यासाठी गंगापूर धरणाच्या परिसरात तरुणाईने येऊ नये, असे आदेश पाटबंधारे खाते व पोलीस प्रशासनाने दिले आहेत.
गंगापूर धरणाचा बॅकवॉटरचा सावरगाव शिवारातील परिसरासह मुख्य प्रवेशद्वार आणि गिरणारे भागातील बॅकवॉटर अशा संपूर्ण धरण परिसरात तरुण-तरुणींचा नेहमीच राबता असतो. धरणाची सुरक्षितता लक्षात घेता या संपूर्ण भागात जलसंपदा विभाग आणि पोलिसांव्यतिरिक्त अन्य कु णालाही प्रवेश देण्यात येणार नाही. हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. यामुळे या भागात युवकांनी येऊ नये, अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. गंगापूर धरणाच्या परिसरात फिरताना आढळणाºया युवकांच्या समूहावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. गंगापूर धरण पाटबंधारे विभागासह पोलीस प्रशासन धरणाच्या सुरक्षिततेसाठी सतर्क झाले आहे. धरण परिसरात वारंवार युवक बुडण्याच्या घडणाºया दुर्घटनांनाही आळा घालण्यासाठी संयुक्तरीत्या कारवाईची मोहीम सुरू केली आहे. पर्यटकांबरोबरच धरणाची सुरक्षा महत्त्वाची असल्यामुळे कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. फिरते गस्त पथक कार्यान्वित असल्यामुळे धरण परिसरात आढळून येणाºया पर्यटक, मद्यपींवर कडक कारवाई केली जात असल्याची माहिती शाखा अभियंता सुभाष मिसाळ यांनी दिली.
धिंगाण्याला बसणार चाप
गंगापूर धरणाचा परिसर हा अत्यंत संवेदनशील आहे. संपूर्ण शहराला पाणीपुरवठा या धरणातून होतो. त्यामुळे धरणाची सुरक्षा व पर्यायाने नागरिकांचीही सुरक्षा महत्त्वाची आहे. पर्यटनाच्या नावाखाली धरण क्षेत्रात हुल्लडबाजी, मद्यप्राशनाला अलीकडच्या काळात वाव मिळाला होता; मात्र पोलिसांनी व पाटबंधारे विभागाने हा उपद्रव थांबविण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामुळे बेभान पर्यटकांच्या धिंगाण्याला आता चाप बसणार आहे.

Web Title:  Gangapur Dam Campus 'Restricted Area'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.