गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 10:59 PM2020-09-02T22:59:24+5:302020-09-03T01:48:29+5:30
मनमाड : गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात मनमाड शहर व परिसरात आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळ तसेच नागरिकांनी साध्या पद्धतीने श्रींचे विसर्जन केले. चांदोरीत ‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रम राबवित मूर्ती संकलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात मनमाड शहर व परिसरात आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळ तसेच नागरिकांनी साध्या पद्धतीने श्रींचे विसर्जन केले. चांदोरीत ‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रम राबवित मूर्ती संकलन करण्यात आले.
वेशीतील श्री नीलमणी गणेश मंडळाच्या पार्थिव गणेशमूर्तीची विसर्जन महामिरवणूक पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवत संपन्न झाली. नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या हस्ते महाआरती होऊन विसर्जन सोहळा कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
लोहोणेर परिसर
लोहोणेर येथे गिरणा नदीतीरावर श्रीच्या विसर्जनाचा कार्यक्रम अत्यंत शांतपणे सुरळीत पार पडला. यावेळी पोलीस यंत्रणा विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या भक्तांना सूचना करीत होते.
गोंदे वसाहत
गोंदे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातील दहा दिवसांसाठी स्थापना केलेल्या गणरायाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनावाद्य अत्यंत साधेपणाने भावपूर्ण निरोप देण्यात आला.शिवतांडव ग्रुप भालूरभालूर येथील माउलीनगर भागात शिवतांडव ग्रुपच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या गणरायाची अतुल व अक्षदा कुलकर्णी यांच्या हस्ते आरती करून भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गावाच्या पश्चिम शिवारातील बंधाºयावर विसर्जन करण्यात आले. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला. भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे आयोजन आदेश शिंदे, आकाश निकम, सौरभ निकम, अमोल निकम, केशव मेंघळ, ललीत आहेर आदी कार्यकर्त्यांनी केले.सिन्नरसह नायगाव खोºयात गणरायाला निरोपसिन्नर/नायगाव : सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खाºयात पुढच्या वर्षी येण्याचा नारा निनादला. सार्वजनिक मंडळांबरोबर घरघुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव, जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, मोह-मोहदरी, सोनगिरी व जोगलटेंभी आदी परिसरात काल दिवसभर गणपती बप्पा मोरया, सुखकर्ता दुखहर्ता व पुढच्या वर्षी लवकर या...च्या मंगलमय घोषणांनी दुमदुमून गेला होता. यंदाच्या वर्षी कोरोनामुळे सार्वजनिक मंडळांना गणपती उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे परिसरात यंदा सार्वजनिकऐवजी घरघुती गणपतींची स्थापना मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती.
पर्यावरण संतुलनासाठी त्र्यंबक पालिकेला मूर्ती दान !
त्र्यंबकेश्वर : येथील गौतम तलाव परिसरात शेकडो गणेशमूर्ती नागरिकांनी दान केल्या. दहा सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन सायंकाळी ७.३० वाजता करण्यात आले. मूर्ती पाण्यात बुडू नये म्हणून पालिका कर्मचारी, जीवरक्षक व पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. विशेष म्हणजे सकाळीच रिक्षाद्वारे गावात फिरून मूर्तींचे विसर्जन करू नये म्हणून जाहीर करण्यात आले होते. सालाबादप्रमाणे पीओपीच्या व शाडूच्या मूर्ती नगर परिषदेने ताब्यात घेतल्या होत्या. जेणेकरून पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही. तलावाचे पाणी दूषित होऊ नये म्हणून पालिकेने काळजी घेतली होती. दरम्यान नगर परिषदेतर्फे पीओपी विरघळण्याचे लिक्विड मागवणार असून विसर्जन करण्यासाठी गावाबाहेर एक कृत्रिम प्लॅस्टिक तलाव निर्माण करणार आहेत.