अधिकाऱ्यांच्या टेबलवर ओतला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:16 AM2020-02-16T01:16:43+5:302020-02-16T01:17:58+5:30

मनमाड नगरपालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरात विविध समस्यांसह घाणीचे साम्राज्य पसरल्याचा मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी पक्षासह सर्वच नगरसेवकांनी गोंधळ घालत प्रशासनाला धारेवर धरले. संतप्त नगरसेवकांनी अधिकाºयांच्या टेबलावर घाण व कचरा टाकून संताप व्यक्त केला.

Garbage poured on officers' tables | अधिकाऱ्यांच्या टेबलवर ओतला कचरा

मनमाड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घाणीच्या प्रश्नावर संतप्त झालेल्या नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या टेबलवर टाकलेला कचरा.

Next
ठळक मुद्देमनमाडला ठिय्या आंदोलन पालिकेच्या सभेमध्ये गोंधळ

मनमाड : नगरपालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरात विविध समस्यांसह घाणीचे साम्राज्य पसरल्याचा मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी पक्षासह सर्वच नगरसेवकांनी गोंधळ घालत प्रशासनाला धारेवर धरले. संतप्त नगरसेवकांनी अधिकाºयांच्या टेबलावर घाण व कचरा टाकून संताप व्यक्त केला.
विकासकामे का रोखून धरली, डेली भाजी मार्केटचे अर्धवट असलेले काम कधी पूर्ण होणार? यासह इतर प्रश्न उपस्थित करून तब्बल एक तासापेक्षा जास्त वेळ नगरसेवकांनी सभागृहाच्या वेलमध्ये ठिय्या आंदोलन केले. शनिवारच्या सभेत कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ६ लाख ४५ हजार ७८० रुपये शिलकीचा अर्थसंकल्प एकमताने मंजूर करण्यात आला.
पालिकेच्या डॉ. आंबेडकर सभागृहात नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्य लेखापाल नाना जाधव यांनी सन २०२०-२१ साठीचे सुमारे १०५ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले. अंदाजपत्रकावर चर्चा होऊन ते एकमताने मंजूर करण्यात आल्यानंतर सर्वसाधारण सभेच्या कामकाजाला सुरु वात झाली.
शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक यांनी शहरातील अर्धवट विकासकामांचा मुद्दा उपस्थित केला, तर गंगाभाऊ त्रिभुवन यांनी डेली भाजी मार्केटचे रखडलेले काम, संगीता पाटील यांनी साफसफाईचा मुद्दा उपस्थित करीत वेलमध्ये येऊन ठाण मांडले. त्यांना पाठिंबा गणेश धात्रक, छोटू पाटील, अमजद पठाण यांच्यासह सर्वच नगरसेवक वेलमध्ये आले व त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. या दरम्यानच शिवसेनेचे नगरसेवक लियाकत शेख यांनी गोणीत भरून आणलेली घाण व कचरा अधिकाºयांच्या टेबलवर टाकला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला
या सभेत २० ठराव मंजूर करण्यात आले असून, आयत्या वेळचे तीन विषयही मंजूर करण्यात आले. सभेला सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Web Title: Garbage poured on officers' tables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.